विदर्भ

गांधीसागर तलाव ठरला "सुसाईड पॉइंट' 

सकाळवृत्तसेवा

नागपूर - शहरातील गांधीसागर तलाव "सुसाईड पॉइंट' ठरला आहे. पाच वर्षांत 209 जणांनी गांधीसागर तलावात आत्महत्या केली, तर दुसऱ्या क्रमांकावर अंबाझरी तलाव आहे. अंबाझरी तलावात आतापर्यंत 74 जणांनी आत्महत्या केल्याची माहिती पोलिस विभागाने केलेल्या सर्वेक्षणातून समोर आली आहे. 

पोलिस दप्तरी आत्महत्या करणाऱ्यांची नोंदी असतात. त्यामध्ये सर्वाधिक आत्महत्या तलावात उडी घेऊन केल्याचे उघड झाले आहे. शहरात फुटाळा तलाव, अंबाझरी, गांधीसागर, गोरेवाडा, कोराडी, पोलिस, नाईक, सोनेगाव व सक्‍करदरा असे नऊ तलाव आहेत. 2013 ते एप्रिल 2018 पर्यंत तलावात उडी घेऊन आत्महत्या करणाऱ्यांची आकडेवारी पोलिस विभागाने सादर केली आहे. आत्महत्या करणाऱ्यांचा सूक्ष्म अभ्यास पोलिसांनी केला असून, त्यासाठी वेळेनुसार सहा भागात वर्गीकरण केले आहे. यामध्ये सर्वाधिक आत्महत्या दुपारी 12 ते 4 वाजतादरम्यान केल्याची नोंद आहे. 

वर्ष 2013 ते एप्रिल 2018 

तलाव आत्महत्या 
अंबाझरी 74 
फुटाळा 43 
गांधीसागर 209 
अन्य तलाव 51 

8 ते 4 वाजेदरम्यान सर्वाधिक आत्महत्या 
आत्महत्या करण्याच्या वेळेचे पोलिसांनी निरीक्षण केले असता सर्वाधिक आत्महत्या सकाळी आठ ते दुपारी चार वाजताच्या झाल्या आहेत. 164 जणांचे मृतदेह सकाळी आठ ते दुपारी चार वाजताच्या सुमारास तलावातून काढले. रात्री दहा ते पहाटे पाच या दरम्यान 110 जणांनी तलावात जीवनयात्रा संपविल्याची माहिती समोर आली आहे. 

नैराश्‍यातून एकलकोंडेपणा निर्माण होतो. त्यामुळे तो एकांत शोधतो. आत्महत्या करताना कोणतीही वेदना होऊ नये, त्यासाठी तलाव हा पर्याय शोधतो. मनात दाटलेली उर्मी वाढत जाऊन आत्महत्येस प्रवृत्त होतो. सर्वांत सोपा उपाय म्हणून तो पाण्यात उडी घेण्याचा निर्णय घेतो. 
- प्रा. राजा आकाश,  मानसोपचारतज्ज्ञ. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Prashant Padole Nagpur Accident : काँग्रेसचे खासदार प्रशांत पडोळेंच्या गाडीचा भीषण अपघात; कारला ट्रकची धडक, थोडक्यात बचावले

Vidarbha News: पेट्रोल पंप मालकावर फौजदारी गुन्हा दाखल; सार्वजनिक सुरक्षेसाठी पेट्रोल पंप नियमांचे काटेकोर पालन आवश्यक

Latest Marathi News Live Update : राज्यावर पुन्हा अवकाळी संकट! वादळी पावसासह गारपिटीचा इशारा, शेतकऱ्यांना सतर्कतेचे आवाहन

Murtizapur-Akola News: पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने पेट्रोल पंपावर रांगा; भरीत भर सकाळपासून तीन पेट्रोल पंप बंद; साठा येण्यास विलंबामुळे पंप बंदची माहिती

Rahul Gandhi:गुजरातमध्ये दलितांवरील अत्याचारात वाढ:राहुल गांधी, भाजप सरकारच्या कार्यकाळात तिरस्कार,भेदभावात वाढ!

SCROLL FOR NEXT