आमदार प्रकाश गजभिये यांच्या एकता गणेश मंडळातर्फे यंदा गणरायाला महात्मा फुले यांची पगडी परिधान करण्यात आली. हिल टॉप येथे १५१ फूट उंचीच्या राष्ट्रपती भवनाची प्रतिकृती असलेल्या शामियानात ही मूर्ती स्थापन केली जाणार आहे. चितारओळीतून वाजतगाजत गणरायाला नेताना क 
विदर्भ

Ganesh Festival : मोरया मोरया गणपत्ती बाप्पा मोरया

सकाळवृत्तसेवा

नागपूर - वाद्यवृंद, ढोल-ताशे, गुलालाची उधळण, फटाक्‍यांची आतषबाजी आणि ‘गणपत्ती बाप्पा मोरया’च्या जयघोषात गणरायाचे आज थाटात आगमन झाले. गुरुवारी सकाळपासूनच शहरात भक्ती आणि उत्साहाचे वातावरण होते. रस्ते गर्दीने फुलून गेले होते. सार्वजनिक मंडळ आणि घरोघरी भक्तिभावाने बाप्पाची प्राणप्रतिष्ठापना झाली. 

बाप्पाला घरी आणण्यासाठी सकाळपासून उत्साह संचारला होता. कोणी डोक्‍यावर तर कोणी कारमध्ये बाप्पाला घरी घेऊन गेले. सार्वजनिक मंडळातर्फे ढोल-ताशांच्या निनादात मिरवणुकीने गणेशाचे शहरातील वेगवेगळ्या वस्त्यांमध्ये आगमन झाले. पूजा, अर्चना, आरती, पारंपरिक वाद्यांचा गजर, फटाक्‍यांची आतषबाजी अशा भावपूर्ण आणि मंगलमय वातावरणात गणरायांचे स्वागत करण्यात आले. प्रामुख्याने महाल चितारओळीतून मोठ्या प्रमाणात मिरवणूक निघत असल्याने भाविकांच्या सुरक्षितेसाठी पोलिसांचा मोठा ताफा ठिकठिकाणी ठेवण्यात आला होता. वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी काही मार्ग वळवण्यात आले होते. रस्त्यांवर रांगोळ्या, फुलांची उधळण, शामियाना टाकून गणेशभक्तांनी गणरायाचे स्वागत केले. गणरायाच्या आगमनामुळे बाजारपेठाही सजल्या होत्या. पूजेचे साहित्य, आरास, दिव्यांच्या माळा, केळीची पाणे, झेंडूची फुले, आकर्षक विद्युत दिव्यांनी महाल, सक्करदरा, मानेवाडा, बर्डी, खामला, हुडकेश्‍वर, तुकडोजी चौक आदी बाजारपेठा सजल्या होत्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MLC निवडणुकीआधीच एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेत वादळ! उमेदवारीवरून खदखद वाढली; पक्षातच बंडाची चिन्हं

Marathi Language Rule, "मुजोरी चालणार नाही," सरनाईकांनी ठणकावले, रिक्षा अन् टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी ३ महिन्यांची मुदत

भोंदूबाबा मनोहर मामा देत होता 'त्या' मराठी मालिकेला फंडिंग? मराठी अभिनेत्यानेच फोडलं बिंग, पोस्ट व्हायरल

Latest Marathi News Live Update : जालना जिल्ह्यात उष्णतेचा कडाका, तापमानाचा पार 42.10 अंशावर

Ulhasnagar: धावत्या लोकलमध्ये चाकू हल्ला अन् लुटीचा प्रयत्न, प्रवासी जखमी; आरोपी अटकेत, VIDEO VIRAL

SCROLL FOR NEXT