Yavatmal Crime sakal
विदर्भ

Yavatmal Crime : पुसदमध्ये रात्री लूटमार करणारी टोळी जेरबंद

पत्नीच्या उपचारासाठी आयकॉन हॉस्पिटलमधून निघालेल्या पतीला मंगळवारी (ता.२१) रात्री लुटणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले व त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला.

सकाळ वृत्तसेवा

पुसद (जि. यवतमाळ) : पत्नीच्या उपचारासाठी आयकॉन हॉस्पिटलमधून निघालेल्या पतीला मंगळवारी (ता.२१) रात्री लुटणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हा शाखेच्या पोलिसांनी जेरबंद केले व त्याच्याकडून चोरीचा ऐवज जप्त केला. पोलिसांच्या या कामगिरीमुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त होत आहे. पुन्हा शहरात लुटमारीच्या घटना घडू नये, यासाठी पोलिसांनी सतर्क राहावे, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली.

ज्ञानेश्वर नारायण पवार (वय ३८, रा. राजुरा, ता. महागाव) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, ते मंगळवारी (ता.२१) आयकॉन हॉस्पिटल पुसद येथे त्यांची पत्नी भरती होती. तिला रक्त्ताची आवश्यकता असल्याने सत्यशांती हॉस्पिटल येथे जाऊन रात्री १०.३० वाजता परत येत असताना हिंदी हायस्कूलजवळ चार अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यावर चाकू लावला. चाकूच्या धाकावर त्यांच्या खिशातील नगदी १५ हजार रोख, सहा हजार रुपये किमतीचा मोबाईल असा एकूण २१ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन पसार झाले. पोलिसांनी गुन्हा नोंद करून आरोपींचा शोध घेतला. पोलिस निरिक्षक उमेश बेसरकर व डी. बी. पथकप्रमुख सहायक पोलिस निरीक्षक नीलेश देशमुख व यांनी लूटमार करणाऱ्यांचा शोध घेतला.

आरोपी पोलिसांच्या ताब्यात

गोपनीय माहितीच्या आधारे संशयित शेख रेहान शेख गुलाब (वय२०, रा. तुकारामबापू वार्ड, ह. मु. वसंतनगर पुसद) याला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याच्याजवळ मोबाईल सापडला. तो मोबाईल ज्ञानेश्‍वर पवार यांचा असल्याची खात्री झाल्याने त्याची कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा केल्याची कबुली दिली. त्याने दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी आयान काजी सैफोदिन काजी (वय१९), शेख नोमान शखे रहेमान (वय२२) व शेख अजिम शेख कयुम (वय२०, रा. सर्व वसंतनगर, पुसद) यांना ताब्यात घेतले असता त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs ENG 1st T20I: Abhishek Sharma ने घडवला इतिहास, पावसाच्या सरींमध्ये इंग्लंडविरुद्ध वादळी फिफ्टी ठोकत विश्वविक्रम रचला

IND vs ENG: पहिल्या T20I सामन्यात ऐनवेळी ड्रामा; अभिषेक-श्रेयसने इंग्लंडला धुतलं, पण शेवटी पावसानं खोडा घातला

IND vs ENG: अभिषेक शर्माचं वादळ घोंगवलं, तर कर्णधार श्रेयस अय्यरचेही अर्धशतक; भारताचे इंग्लंडसमोर मोठे लक्ष्य

Raigad Rain Alert: रायगडमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; अलिबागसह सात तालुक्यांतील शाळा व अंगणवाड्यांना सुट्टी

Woman Success Story: ३३ गुंठ्यात फुलली यशाची बाग! दरमहा २०-२५ हजारांचा निव्वळ नफा; वडगाव आनंदच्या महिला शेतकऱ्यांची शेती ठरली इतरांसाठी प्रेरणादायी..

SCROLL FOR NEXT