ganja.jpg 
विदर्भ

...त्याने चक्क पोलिसांच्या समोर आरोपीला दिली गांजाची पुडी

सकाळ वृत्तसेवा

अकोला : अत्याच्याराच्या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपीला न्यायालयात नेत असतांना एकाने आरोपाला गांजाची पुडी देत पोलिसांनाही मारहाण केल्याची घटना सोमवारी (ता.17) न्यायालय परीसरात घडली. प्रशांत दत्तात्रय झाडे 27, असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.

पोलिस सूत्रांच्या माहितीनुसार, अत्याचाराच्या प्रकरणात आरोपी अनुप गणेश परीहार याला सोमवारी न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावली. यादरम्यान न्यायालय परिसरातून आरोपीला बाहेर काढत असतांना पोलिसांच्या गाडीत एकाने गांजाची पुडी फेकली. पुडी फेकणाऱ्याला पोलिसांनी पकडण्याचा प्रयत्न केला असता त्याने पोलिसांना मारहाण केली.

यामध्ये पोलिस कर्मचारी कमोद लांडगे, सतीश प्रधान हे जखमी झाले आहेत. काही वेळानंतर पुडी फेकणाऱ्याला पोलिसांनी अटक केली. प्रशांत दत्तात्रय झाडे (27 रा. वानखडे नगर डाबकी रोड) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींचे नाव आहे. आरोपीविरोधात रामदासपेठ पोलिस स्टेशनला गुन्हे दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीला दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावली आहे, पोलिस अधिकारी विजयकुमार अरवार हे तपास करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सभ्य रहा, नीट कपडे परिधान करा! भाडेकरू मुलींना घरमालकाचा सल्ला, रूममध्ये लावला CCTV कॅमेरा

Duleep Trophy 2026: हा, मुलगा कमाल आहे! वैभव सूर्यवंशीच्या सांगण्यावरून DRS घेतला अन् सामन्यात ट्विस्ट आला Video Viral

मुलांना शाळेत जायला चीनने बांधली ९०० फूट उंच लिफ्ट, आता पर्यटकांची होते गर्दी; विद्यार्थ्यांचा ३ तासांचा प्रवास काही मिनिटात

Marathi News Live Updates : सरकारने आवश्यक ते निर्णय घेतलेत, शिष्टमंडळ जरांगेंकडे जाणार नाही : विखे-पाटील

Uttar Pradesh: अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात ५० टक्के वाढ! दीड लाखांहून अधिक महिलांना योगी सरकारचे गिफ्ट

SCROLL FOR NEXT