file photo 
विदर्भ

रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जा वापरा कर सवलत मिळवा

सकाळ वृत्तसेवा

नागपूर : भविष्यातील पाणीटंचाई आणि विजेचा तुटवडा लक्षात घेता रेन वॉटर हार्वेस्टिंग आणि सौरऊर्जेच्या वापरासाठी नागरिकांना प्रोत्साहन देण्यासाठी महापालिकेने मालमत्ता करात सवलत देण्याचा निर्णय घेतला.
रेन वॉटर हार्वेस्टिंग, सौरऊर्जेचा वापर, गांडूळ खत, घनकचऱ्यापासून खतनिर्मिती व वापर यासारखे पर्यावरणीय प्रकल्प जर नागरिक राबवीत असेल तर त्यांना सामान्य करात पाच ते आठ टक्के कर सवलत नागरिक प्राप्त करू शकता, अशी माहिती सहायक आयुक्त (कर आकारणी) मिलिंद मेश्राम यांनी दिली. यात नमूद केलेल्या प्रकल्पांपैकी जर एक प्रकल्प नागपूर शहरातील नागरिक राबवत असेल तर सामान्य करात पाच टक्के सवलत मिळेल. एकापेक्षा अधिक प्रकल्प राबवत असेल तर सामन्य करामध्ये आठ टक्के सवलत मिळेल. याशिवाय चालू वर्षाचा मालमत्ता कर नोव्हेंबरपूर्वी अदा केला तर सामान्य कराच्या रकमेत चार टक्के सवलत मिळणार आहे. यापैकी जास्तीत जास्त पर्यावरणीय प्रकल्पांचा आपल्या मिळकतीत वापर करून आपल्या सामान्य करामध्ये सवलत प्राप्त करण्याचे आवाहन मनपाने केले आहे. मनपाच्या या स्तुत्य उपक्रमात मोठ्या संख्येने महिला सहभागी होत आहेत.
आतापर्यंत रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी सौरऊर्जेचा वापरासाठी, गांडूळ खतनिर्मितीसाठी, सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी नागरिकांना आपल्या सामान्य करामध्ये सवलत प्राप्त झाली. नवीन बांधकाम करताना आता रेन वॉटर हार्वेस्टिंग करणे बंधनकारक आहे. बांधकामाचा नकाशा मंजूर करताना आर्किटेक्‍टकडून रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रमाणपत्र देणे आवश्‍यक आहे. याशिवाय मोकळे भूखंड, वापरात नसलेल्या मालमत्ता, रिक्त मालमत्ता याबाबत मालमत्ताधारकाने संबंधित मनपा झोनमध्ये संपर्क साधून कराचे मागणी देयके प्राप्त करावे व मालमत्ता कर नागपूर महानगरपालिकेच्या खात्यात भरावा. मालमत्ता कर नियमावलीमध्ये झालेल्या बदलानुसार नवीन मालमत्ता खरेदी केल्यास, नवीन बांधकाम केल्यास संबंधित झोनमध्ये मालमत्ता कर पुनर्निधारणसंबंधी कार्यवाहीची प्रक्रिया करून घ्यावी, असेही सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांनी सांगितले.
नागरिकांनी त्यांच्याकडे असलेला थकीत मालमत्ता कर लवकरात लवकर नागपूर महानगरपालिकेच्या संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन पद्धतीने अथवा नागपूर महानगरपालिकेच्या कर वसुली केंद्रावर जाऊन थकीत मालमत्ता कर भरावा व मालमत्ता कर अदायगीअभावी होणारी लिलावाची कारवाई टाळावी, असे आवाहन महानगरपालिकेच्या कर विभागाद्वारे करण्यात आले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Tata Chairman Salary: Tata Sons च्या चेअरमनला किती पगार मिळतो? नोएल टाटांच्या विरोधानंतर पद पुन्हा चर्चेत; आकडा पाहून धक्का बसेल!

Akola News : जिल्हाधिकाऱ्यांनी सोडले शेतकऱ्यांना वाऱ्यावर; महाबीज प्रशासनाकडून माहिती देण्यास नकार, एमडींनीही केले हात वर

Ai+ Nova 2 Power 5G भारतात लाँच! 16,999 रुपयांत खरेदीची संधी...पाहा फीचर्स अन् ऑफर्स!

Katraj Kondhwa Road Issue : आयुक्तांचे आश्वासन विरणार हवेत! कात्रज कोंढवा रस्ता; उर्वरित १० मिळकतींमुळे रस्ता रुंदीकरण रखडणार

Farmer Agitation : शेतकरी संकटात, सरकार कुठंय? लोहाऱ्यात हजारो शेतकऱ्यांचा आक्रोश; आमदारांना बोलण्यास मनाई करत शेतकऱ्यांनी सोयाबीन उधळले

SCROLL FOR NEXT