ibis
ibis 
विदर्भ

दुर्मिळ ब्लॅक आयबीस पक्षाला मिळाले जीवनदान 

सकाळवृत्तसेवा

चिमूर : मानवी हस्तक्षेप, जीवनपद्धती आणि आधुनिक तंत्रज्ञानामुळे अनेक पक्षी नष्ट झाले असून अनेक पक्षी अस्तित्वासाठी धडपडत आहेत. अशाच प्रकारे दुर्मिळ होत चाललेला ब्लॅक आयबीस जातीचा दुर्मिळ पक्षी चिमूर येथील सर्कस मैदानावरिल टाॅवरवरुन पडल्यामुडे पक्ष्याला दुखापत झाली. स्थानिक नागरिक व सहाय्यक शिक्षक लोणे यांनी त्या पक्ष्याला आपल्या घरी ठेवले आणि पर्यावरण संवर्धन समितीच्या पुढाकाराने त्यावर उपचार करून नैसर्गिक निवासा करीता सोडून दिले.

संस्कृतमध्ये रक्तशिर्ष मराठीत काळा अवाक आणि इंग्रजी मध्ये ब्लॅक आयबिस संबोधल्या जाणाऱ्या व स्युडिबिस पॅपिलोसा शास्त्रीय नाव असलेले अवाकाद्य पक्षी कुळातील या पक्षाचे वास्तव्य नद्या तलाव, भातशेतीचा प्रदेश व दलदलीच्या प्रदेशात असते. दक्षिण आशीया खंडात आढळणाऱ्या या पक्षाचा रंग विटकरी काळा, चोच तपकीरी व बाकदार असते, खांद्यावर ठळक पांढरा भाग व डोक्यावर पिसांचा अभाव असतो. मोबाईल टॉवर किंवा उंच ठिकाणी जोळीणे किंवा समुहाने राहतो. हाच पक्षी चिमूर येथील सर्कस ग्राऊंडमध्ये असलेल्या टॉवरवरून पळल्याचे शिक्षक लोणे व नागरिकांना दिसला जखमी अस्वस्थेतील या पक्षाला लोणे यांनी घरी आणले.

जखमी पक्षाला चारा (गहु, तांदूळ) टाकण्यात आले मात्र ब्लॅक आयबिस प्रतिसाद देत नव्हता. याची माहिती पर्यावरण संवर्धन समितीचे अध्यक्ष कवडू लोहकरे यांना देण्यात आली लोहकरेंनी वन विभागाला याची सूचना केली त्याप्रमाणे वनविभागाचे कर्मचारी आणी पर्यावरण संवर्धन समितीच्या कार्यकर्त्यांनी तातळीने यावर उपचार केले.

दोन दिवसापासून हा पक्षी उपासी असल्याचे कळाल्याने त्याला मासे खायला देण्यात आले. उपचार व खाद्य मिळाल्याने पक्षी तरतरीत झाला आणि जिवनदान मिळाल्याने सगळ्यांनी सुटकेचा श्वास सोडला. त्यांनतर या काळ्या अवाकला त्याच्या नैसर्गीक स्थळी सोडण्यात आले. या वेळेस पर्यावरण संवर्धन समिती अध्यक्ष कवडु लोहकरे, वनरक्षक नरड़, निखिल भालेराव, ऋषिकेश बाहुरे ,आशिष ईखारे, संदिप किटे, सौरभ गायकवाड, मोहन सातपैसे, केमदेव वाटगुरे तथा वनविभाग कर्मचारी उपस्थित होते. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: रसेलने स्टॉयनिस पाठोपाठ पूरनलाही धाडलं माघारी; लखनौचा निम्मा संघ गारद

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT