snake
snake 
विदर्भ

बापरे बाप...एवढ्या साऱ्या पिलांना जन्म! 

अभय भुते

जेवनाळा (जि. भंडारा) : येथील सर्पमित्र समित हेमणे याने गावात आढळून आलेल्या घोणस जातीच्या सापाला पकडले. त्यानंतर घरी सुरक्षित ठिकाणी ठेवले असता रात्री सापाने 59 पिलांना जन्म दिला. त्यानंतर ही सर्व पिले सुरक्षित ठिकाणी सोडण्यात आली. 

सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत. त्यामुळे सापांचा सगळीकडे मुक्तसंचार सुरू आहे. जेवनाळा येथे एका घरी गुरुवारी घोणस हा विषारी साप आढळून आला. त्याला नागरिकांनी इजा पोहोचवू नये म्हणून सर्पमित्र समित हेमणे, संदीप शेंडे, रोशन नैताम यांनी त्याला पकडून सुरक्षित स्थळी आणून ठेवले. साप पकडायला उशीर झाल्याने त्याला रात्रभर घरीच ठेवले.

सकाळी त्याला जंगलात सोडायला नेण्यासाठी बघायला गेले असता त्या सापासोबत त्याचे 59 पिलं दिसून आले. सापाच्या भारामुळे पिलांना इजा पोहोचू नये म्हणून त्यांना वेगवेगळे करण्यात आले. या सापांना बघण्यासाठी अनेक सर्पमित्रांनी येथे भेट दिली. सापासह त्याच्या सर्व पिलांची अड्याळ येथील वनविभागाच्या कार्यालयात नोंद करून आरक्षित क्षेत्रात सोडण्यात आले. 

घोणस हा फार विषारी साप असून पर्यावरणासाठी उपयुक्त आहे. आम्ही या सापाला त्याच्या पिलांसह सुरक्षित सोडले आहे. परिसरात कोणताही साप आढळून आल्यास सर्पमित्रांना बोलावून त्यांना जीवनदान द्यावे. 
-समित हेमणे 
सर्पमित्र जेवनाळा. 

संपादन - राजेंद्र मारोटकर 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

PM Modi: 'आज मला खूप राग येतोय, भारतीयांना शिवी देण्यात आली'; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावरुन मोदींचा काँग्रेसवर घणाघात

Fact Check: पूजेच्या साहित्यावर जीएसटी सूट देण्यास काँग्रेसने विरोध नाही, फेक पोस्ट होताहेत व्हायरल

Deepfake Detector : आता डीपफेक व्हिडिओ ओळखणं झालं सोपं; 'ओपन एआय' कंपनीने लाँच केलं नवीन टूल

Latest Marathi News Live Update : राष्ट्रवादीचे माजी आमदार दिलीप वाघ यांच्या निवासस्थानी महायुतीची बैठक

राज्यातील चार शिक्षक व पदवीधर मतदारसंघासाठी निवडणूक जाहीर; कधी होणार मतदान?

SCROLL FOR NEXT