FARMER
FARMER SAKAL
विदर्भ

Farmer : घोणसअळीने चावा घेतला,अन तो थेट रुग्णालयात पोहचला

संदिप रायपुरे

गोंडपिपरी : यावर्षी झालेल्या रेकार्डब्रेक पावसान होत्याच नव्हत झाल.हातच पिक गेल आता असलेल्या थोडाफार पिकाला वाचविण्याच्या प्रयत्नात बाळीराजा जिवाचे रान करित आहे.आपल्या शेतात कामा करीत असताःना एका तरूणाला घोणसअळी चावली अन त्याला थेट रूग्णालयात दाखल व्हाव लागल.विषारी असलेली घोणस अळी आढळून आल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.

विषारी समजली जाणारी घोणस अळी किवा डंकअळी ( स्लज कॕटरपिलर ) अळी जिल्ह्यात सर्वप्रथम चिमूर तालुक्यात आढळून आली.एका शेतकऱ्याला अळीने चावा घेतला.ही घटना ताजी असतांनाच गोंडपिपरी तालुक्यातील सकमूर गावातील संदिप पिपरे या तरूण यूवकाला घोणस अळीने आज ( मंगळवार ) चावा घेतला.प्रकृती अस्थव्यस्थ वाटू लागल्याने संदिपने ग्रामीण रूग्णालयात धाव घेतली.रूग्णालयात त्याचावर उपचार सूरू आहे.संदीपची प्रकृती आता बरी आहे.या प्रकाराची माहीती मिळताच तालुका कृषी अधिकारी मंगेश पवार यांनी संदिप पिपरेची याची रूग्णालयात जावून भेट घेतली.या अळीने शेतकऱ्यांची चिंता वाढविली आहे.

कशी असते घोणस अळी..

घोणस आळी विषारी असते.ब्लेडसारखी काटेरी असते.या अळीचा पाठीवर केस असतात.या केसातून एक प्रकारचे रसायन बाहेर पडते.ते विषारी असते.तिचा रंग पिवळा,हीरवा असतो.घोणस अळीनं चावा घेतल्यास अंग बधिर होतं.मात्र उपचार केल्यास बरे होतात.दरम्यान या अळी सःदर्भात कृषी विभागाने शेतकऱ्यांना जागृत असावे असे आवाहन केले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

Lok Sabha Election 2024 : डमी नावाच्या उमेदवारांना निवडणूक लढविण्यास मनाई करा; प्रकरण कोर्टात पोहचलं पण...

SCROLL FOR NEXT