girl and boy suicide in warora of chandrapur 
विदर्भ

शाळेत प्रॅक्टीकल असल्याचे सांगून घरून गेली तरुणी, प्रत्यक्ष बघितल्यानंतर सरकरली कुटुंबीयांच्या पायाखालची जमीन

सकाळ डिजिटल टीम

वरोरा (चंद्रपूर) : चेन्नई-नवी दिल्ली रेल्वेमार्गावर सोमवारी (ता. १) सकाळी एकर्जुना शिवारात एका तरुण जोडप्याचे मृतदेह आढळून आले. वरोरा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन चौकशी केली. मृत तरुणाचे नाव आकाश नीळकंठ मेश्राम (वय २२) असून तो वर्धा जिल्ह्यातील गोविंदपूर (ता. समुद्रपूर) येथील, तर मुलगी ही अल्पवयीन असून ती भद्रावती (जि. चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. 

आकाशचे भद्रावती येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वॉर्डात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीसोबत प्रेमसंबंध होते, अशी चर्चा आहे. अकराव्या वर्गात शिकणारी ही मुलगी २८ फेब्रुवारीला सकाळी शाळेत प्रॅक्‍टिकल असल्याचे सांगून घराबाहेर पडली. मात्र, रात्र होऊनही ती घरी परतली नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी शोध घेतला. मात्र, तिचा कुठेही शोध लागला नाही. आज भद्रावती पोलिसांत हरविल्याची तक्रार कुटुंबीय देणार होते. सोमवारी सकाळच्या सुमारास एकार्जुना शिवारात चेन्नई-नवी दिल्ली या रेल्वे मार्गावरील पोल क्रमांक ८३४ येथे दोन मृतदेह आढळून आले. घटनास्थळावर एमएच ३२ एस ९६८५ क्रमांकाची दुचाकी आढळून आली. वरोरा रेल्वे पोलिसांनी याबाबतची माहिती वरोरा पोलिसांना दिली. दोन्ही मृतदेह उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. मृत आकाशच्या खिशात आढळून आलेल्या चिठ्ठीवरून त्याची ओळख पटली, तर मुलीच्या मृतदेहाची ओळख पटविण्यासाठी तिच्या कुटुंबीयांना बोलाविण्यात आले. आकाश हा वरोरा येथील एका खासगी सुरक्षा कंपनीकडे आज रुजू होणार होता, अशी चर्चा आहे. मात्र, त्यांच्या आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. पुढील तपास सुरू आहे. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Viral: 50% दिव्यांग… पण हिम्मत 100%! 52 वर्षीय Zepto Delivery Partner महिला ठरतीय सर्वांसाठी प्रेरणा; व्हिडिओ एकदा पाहाच!

Numerology 2025: 'या' मूलांकांचे लोक पैसे कमवण्यात पटाईत असतात; ती संख्या कोणती? जाणून घ्या...

Latest Marathi News Update : इंडिगो एअरलाइन्समुळे बाधित झाल्याने प्रवाशांनी स्पेशल ट्रेन्सचा घेतला आधार!

Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्ग सुसाट! आतापर्यंत 3 कोटी वाहनांचा प्रवास

Jalgaon News : जळगावात हुडहुडी भरवणारी थंडी! पुढील दोन दिवसांत पारा ८ अंशांपर्यंत घसरणार; शीतलहरीमुळे गारठ्यात मोठी वाढ

SCROLL FOR NEXT