Girl committed suicide due to threats of her lover 
विदर्भ

प्रियकाराच्या धमक्यामुळेच मुलीने आत्महत्या केली

नातेवाईकांचा आरोप: प्रियकारा विरुद्ध 306 व अट्रॉसिटी गुन्हा दाखल

प्रशिक मकेश्वर.

तिवसा - आठ दिवसा पूर्वी लग्न झालेल्या सेजल विश्वासराव काळबांडे वय 21, रा. निंभोरा या विवाहित मुलीने दिनांक 17जुलै रोजी राहत्या घरात विष प्राशन केल्याने तिचा उपचारा दरम्यान 18जुलैला खाजगी रुग्णालयात मृत्यू झाला,मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे, गावातील घरा शेजारी राहणाऱ्या मुलाच्या सततच्या धमक्यामुळे मुलीने आत्महत्या केल्याचा आरोप मुलीच्या आई,वडिलांनी तिवसा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीतून केला आहे.

मुलीच्या पसंतीने वडिलांने आपल्या एकुलत्या एक मुलीचे लग्न मोठ्या थाटात करून दिले,लग्न झालं लग्न समारंभाचा कार्यक्रम आटपून मुलगी हाशीकुशीत घरी आली आणि काही दिवस राहली, मात्र 17जुलैला अस काय झालं कीं आपल्या एकुलत्या एक मुलीने जीवन संपविण्याइतका टोकाचा निर्णय घेतला,मुलीच्या आत्महत्येमुळे काळबांडे परिवाराला मोठा धक्काच बसला. 21वर्ष सेजलचे घरा शेजारी राहणाऱ्या ऋतिक सुभाषराव डहाके वय 22 या तरुणांसोबत प्रेमसंबंध जुडले होते.

याची कल्पना सेजलच्या घरच्या लोकांना असल्यामुळे त्यांनी आरोपी मुला समोर सेजलच्या लग्नाचा प्रस्ताव टाकला होता. परंतु महार जातीमुळे मुलाने लग्नाला स्पष्ट नाकार दिल्याने वडिलांने तीच्या सहमतीने दुसरीकडे लग्न लावून दिल. मात्र आरोपी मुलगां लग्नानंतर सुद्धा तिला सतत फोनवरून तू लग्न का केले, आता मी तुझ्या भावाला, वडिलांना जीवाशी संपवितो, अशा धमक्या देत होता. त्यामुळे शेवटी बदनामीच्या भीतीपोटी सेजलने 17जुलै रोजी रात्रीला विष घेऊन आत्महत्या केली,मात्र ही आत्महत्या नसून हत्या आहे,मुलाच्या सततच्या धमक्या व मानसिक त्रासाला कंटाळून मुलीने आत्महत्या केली असा आरोप करत मुला विरोधात तिवसा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.पोलीसांनी मुला विरुद्ध 306सह अट्रॉसिटी अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे, तर 17जुलैपासूनच मुलगा गावातून फरार असल्याची माहिती पुढे येत आहे..

दोघांचे संभाषण..

अंतविधी झाल्यावर दुसऱ्या दिवशी राख विसर्जन करून सर्व घरी आल्यावर सेजलच्या फोनमध्ये घरच्यांना लग्ना आधी व येत्या काही दिवसात दोघांमध्ये झालेल्या संभाषणाची रेकॉर्डिंग आढळून आली. दोघांमध्ये झालेल्या संभाषणात मुलगा धमक्या देत असल्याचे स्पष्ट होताच तक्रार देण्याचा निर्माण सेजलच्या घरच्या लोकांनी घेतला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Devendra Fadnavis: कर्करोग उपचार खर्च कमी होणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पुण्यात पीपीपी तत्त्वावर नवे मेडिकल सेंटर सुरू!

बुंडिबुग्यो व्हायरस, इबोलाच्या साथीचा उद्रेक; ८८ जणांच्या मृत्यूनंतर WHOने जाहीर केली ग्लोबल हेल्थ इमर्जन्सी

Anand Paranjpe Sharad Pawar Meeting : पक्ष प्रवेश एकनाथ शिंदेंच्या पक्षात, भेट घेतली शरद पवारांची; ठाणेकर आनंद परांजपेंच्या भेटीने चर्चांणा उधाण

'सिंगल फादर असल्यानं मुलीच्या मैत्रिणी घरी येत नाही' इमरान खान म्हणाला, 'त्यांच्या आई वडिलांना माझ्याकडे मुलींना पाठवायला भिती...'

Kalyan Crime: कल्याण रेल्वे यार्डात मुलीवर अत्याचार; आरोपीला काही तासांत अटक, मोबाईल जबरदस्तीने हिसकावून घेतला अन् काय घडलं!

SCROLL FOR NEXT