corona
corona 
विदर्भ

मृत्यू होता दारावर! ती कोरोनातून बरीही झाली, मात्र...

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : मृत्यू हे अटळ सत्य असले तरी ते सत्य पचवणे खूप कठीण आहे. कोणाचा मृत्यू कोणत्या रुपाने येईल, हे सांगता येत नाही. कोराना महामारीने प्रत्येकाच्याच मनातली मृत्युविषयीची दहशत प्रचंड वाढलेली आहे. त्यातल्या त्यात अकाली अल्पवयात आलेला मृत्यू आप्तस्वकीयांसाठी अत्यंत दु:खदायक ठरतो. कोरोनामुळे अशा अकाली मृत्युचे दु:ख अनेकांच्या वाट्याला आले. मृत्यू नेहमीच कुठल्या तरी आजाराच्या आड लपून येतो. किंवा अपघाताच्या रुपाने येतो. असाच अकाली मृत्यू सावंगी मेघे रुग्णालयात उपचाराकरिता आलेल्या युवतीला आला.

चार तरुणींना कोरोनाची लागण झाल्याचे पुढे येताच त्यांच्यावर सावंगी मेघे रुग्णालयात उपचार सुरू झाले. या चौघींनीही कोरोनावर मात केली. त्यामुळे धोका टळला असे वाटत असतानाच त्यातील एकीचा मंगळवारी (ता. दोन) पहाटेच्या सुमारास मेंदूज्वराने घात केला. मेंदूज्वराने तिचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाकडून देण्यात आली.

या युवतीसोबत असलेल्या दोघींना दोन दिवसांपूर्वी तर एकीला काल सुट्टी देण्यात आली. तर या तरुणीवर मेंदूज्वराचा उपचार सुरू होता. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात आले. यातच तिचा मंगळवारी (ता. दोन) उपचारादरम्यान मृत्यू झाला.

धामणगाव येथून आलेल्या या युवतीला उपचाराकरिता रुग्णालयात दाखल करण्यात आले. यावेळी तिची कोरोना चाचणी करण्यात आली. यात ती कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले. यामुळे तिच्या सोबत असलेली तिची आई आणि दोन बहिणींचीही तपासणी करण्यात आली. यात त्या तिघीही कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले. चौघींवरही 14 दिवस कोरानासाठी उपचार करण्यात आले व चौघींनी कोरोनावर मातही केली. यांना रुग्णालयातून सुट्टी देण्याचा निर्णयही झाला, मात्र एकीने आपली तब्येत ठिक वाटत नसल्याचे डॉक्‍टरांना सांगितले, तिची तपासणी केल्यानंतर तिला मेंदूज्वर असल्याचे निष्पन्न झाले आणि अवघ्या दोनच दिवसात त्यातील एकीचा मेंदूज्वराने घात केला.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 61 टक्के, महाराष्ट्रात 54.09 टक्के मतदान

IPL 2024 DC vs RR Live Score: अर्धशतकवीर पोरेलपाठोपाठ ऋषभ पंतही झाला बाद, दिल्लीचा निम्मा संघ परतला माघारी

राज्यसेवेला वर्णनात्मक पॅटर्न २०२५ पासूनच; बदल करण्याचा MPSCचा कुठलाही मानस नाही

Russia : पुतिन यांनी पाचव्यांदा घेतली रशियाच्या राष्ट्राध्यक्षपदाची शपथ; आता पेलावी लागणार 'ही' आव्हाने

Latest Marathi News Live Update : PDCC बँकेवर आचारसंहिता भंगप्रकरणी गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT