file photo
file photo 
विदर्भ

बापानेच केला मुलीवर बलात्कार

सकाळवृत्तसेवा

नागपूर : सख्ख्या बापानेच 14 वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना पाचपावलीत उघडकीस आली. बापलेकीच्या पवित्र नात्याला काळिमा फासणाऱ्या बापाला पोलिसांनी अटक केली.
आरोपी वडील फॅक्‍टरीत कामाला असून, दारूचे व्यसन आहे. पत्नी चितारओळीत किराणा दुकानात काम करते. त्यांना मुलगी (14) आणि दोन मुले आहेत. त्याची वाईट नजर सातव्या वर्गात शिकत असलेल्या मुलीवर होती. त्याने आठ महिन्यांपूर्वी घरात कुणीही नसताना मुलीशी अश्‍लील चाळे करून शारीरिक संबंध प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र, मुलीने हातापाया लागून स्वतःची सुटका करून घेतली होती. त्यानंतरही दारूच्या नशेत अनेक वेळा रात्री झोपेत असलेल्या मुलीशी अश्‍लील चाळे केले. कुणालाही सांगितल्यास घराबाहेर काढण्याची व ठार मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे वडिलांची तक्रार आईकडे कशी करावी? या विचारात ती आठ महिन्यांपासून नराधम बापाचा अत्याचार सहन करीत होती.
बुधवारी दुपारी आरोपी वडील सकाळी कामावर गेला आणि तासाभरात घरी परतला. घरात कुणीही नसल्याची संधी साधून त्याने मुलीला ओढत घरात नेले व अश्‍लील चाळे करीत अत्याचार केला. तसेच ठार मारण्याची धमकी दिली. सायंकाळी आई घरी आल्यानंतर तिने घडलेला प्रकार सांगितला. त्यामुळे आईने मुलीसह पाचपावली पोलिस ठाणे गाठून ठाणेदार अशोक मेश्राम यांची भेट घेतली. त्यानंतर तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
शिक्षिकेने दाखवली नाही हिंमत
आठ महिन्यांपूर्वी वडिलाने केलेले कृत्य मुलीने वर्गमैत्रिणीला सांगितले होते. त्यानंतर वर्गशिक्षिकेला हा प्रकार सांगितला होता. मात्र, शिक्षिकेने आरोपी स्वतः वडील असल्यामुळे विद्यार्थिनीच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही. जर शिक्षिकेने थोडी हिंमत दाखवली असती तर हा प्रसंग विद्यार्थिनीवर ओढवला नसता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thomas Cup 2024: भारताचा पुरुष बॅडमिंटन संघ उपांत्यपूर्व फेरीत, इंग्लंडचा 5-0 ने उडवला धुव्वा

Waluj Nagar Accident : हळद लागण्यापूर्वीच काळाने घातली झडप, दुचाकीच्या अपघातात तरुण ठार

IPL 2024, KKR vs DC Live Score: अक्षर पटेलने दिल्लीला मिळवून दिलं पहिलं यश; सुनील नारायण स्वस्तात बाद

''सत्तेत आल्यास जातनिहाय आणि आर्थिक सर्वेक्षण करू.. राज्य घटना बदलण्याचा भाजप आणि संघाचा कट'', काय म्हणाले राहुल गांधी?

Satara : कऱ्हाडला घुमला 'मोदी...मोदी'चा नारा; महायुतीच्या नेत्यांचे जोरदार शक्तीप्रदर्शन, रखरखत्या उन्हातही मोठा उत्साह

SCROLL FOR NEXT