Girls run to police due to pressure for marriage Amravati crime news 
विदर्भ

अल्पवयीन मुलीने लग्न करावे म्हणून आईच टाकायची दबाव; पोलिसात धाव घेतल्याने युवकासह दोघांविरुद्ध गुन्हा

संतोष ताकपिरे

अमरावती : ओळखीतील मुलासोबतच अल्पवयीन मुलीने लग्न करावे यासाठी आईने मुलीवरच दबाव टाकून छळ केला. आईच्या जाचातून स्वत:ची सुटका करून घेण्यासाठी मुलीने गाडगेनगर ठाण्यात धाव घेतली. गाडगेनगर पोलिसांनी अल्पवयीन मुलीच्या तक्रारीवरून आईसह ज्या मुलासोबत लग्न करण्याचे ठरविले होते, तो युवक अशा दोघांविरुद्ध बालविवाह प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मुलगी ही शाळेत शिकते. ती काही महिन्यांपासून आईसह वलगाव मार्गावरील झोपडपट्टीत राहते. महिलेला पहिल्या पतीपासून असलेली ही मुलगी आहे. काही दिवसांपूर्वी महिलेने एका व्यक्तीसोबत पुर्न:विवाह केला. त्यामुळे ती रहाटगाव येथे मुलीला घेऊन दुसऱ्या पतीसोबत राहत होती. परंतु, आंतरजातीय विवाहामुळे या दाम्पत्याला तेथून बाहेर काढल्याचे पोलिसांनी सांगितले.

त्यामुळे महिला, मुलगी व पती हे वलगाव मार्गावर झोपडपट्टीत राहू लागले. मुलीच्या आईची रहाटगाव येथील काही लोकांसोबत ओळख होती. त्यात एका २० वर्षीय युवकाचाही समावेश होता. त्या युवकाला महिलेच्या अल्पवयीन मुलीसोबत लग्न करण्याची इच्छा होती. मुलगी लग्नासाठी तयार नव्हती.

परंतु, लग्न त्याच मुलासोबत करावे यासाठी आईने तिच्यावर काही दिवसांपासून दबाव आणणे, मारण्याची धमकी देणे सुरूच ठेवले होते. अखेर आई घरी नसल्याचे बघून अल्पवयीन मुलीने थेट गाडगेनगर ठाणे गाठून स्वत:च्या आईविरुद्धच तक्रार नोंदविल्यामुळे आईसह रहाटगाव येथील युवक अशा दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करून आईला अटक केल्याचे पोलिसांनी सांगितले.

मुलीला सुधारगृहात पाठविले

आईच्या जाचामुळे पोलिसात धाव घेणाऱ्या अल्पवयीन मुलीला सुरक्षितता म्हणून मुलींच्या शासकीय सुधारगृहात पाठविण्यात आले, असे गाडगेनगर ठाण्याचे पोलिस निरीक्षक आसाराम चोरमले यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

ED Action against Anil Ambani : अनिल अंबानींवर ‘ED’ची मोठी कारवाई!, मुंबईतील अलीशान घर तात्पुरते जप्त

PCMC News : ‘स्थायी’च्या अध्यक्षपदासाठी अभिषेक बारणेंना संधी; एकमेव अर्ज दाखल; बिनविरोध निवड निश्चित, शनिवारी होणार शिक्कामोर्तब

Lung cancer in Mumbai : मुंबईत फुफ्फुसांच्या कर्करोगाच्या ५७ टक्के रुग्णांमध्ये प्रदूषण हेच प्रमुख कारण!

SL vs NZ, T20 WC: न्यूझीलंडची उपांत्य फेरीच्या दिशेने वाटचाल! श्रीलंकेचे आव्हान संपुष्टात, जाता जाता पाकिस्तानची लावली वाट

Bride shot at wedding ceremony Video : विवाहमंडपात थरार! नववधूवर माथेफिरू प्रियकरानं सर्वांसमोरच झाडली गोळी

SCROLL FOR NEXT