Give bonus of seven hundred rupees to farmers Narendra Bhondekar demand to CM Eknath Shinde sakal
विदर्भ

धान उत्पादकांना सातशे रुपये बोनस द्या; नरेंद्र भोंडेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

आमदार नरेंद्र भोंडेकर यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, नागपूर, वर्धा या जिल्ह्यांमध्ये धानाचे उत्पादन घेतले जाते. येथील शेतकऱ्यांना ७०० रुपये प्रतिक्विंटल धानाला बोनस देण्यात यावे, अशी मागणी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. धान पिकाला उत्पादन खर्चावर आधारित भाव मिळत नसल्यामुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. बियाणे, खते, औषधी यांच्या वाढलेल्या किमती, मजुरी खर्चात झालेली वाढ, डिझेलचे वाढलेले दर यामुळे धान पिकाच्या लागवड खर्चात वाढ झालेली आहे. त्या तुलनेत केंद्र सरकारने प्रतिक्विंटल १९४० रुपये जाहीर केलेला हमीभाव अत्यल्प आहे.

याशिवाय कधी ओला दुष्काळ, तर कधी कोरडा दुष्काळ या नैसर्गिक आपत्तीचा सामनासुद्धा शेतकऱ्यांना करावा लागतो. या सर्व अडचणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने २०० रुपये, राज्य सरकारने ५०० रुपये असा ७०० रुपये प्रतिक्विंटल बोनस देण्याचा निर्णय घेतला होता. राज्यातील आघाडी सरकारने २०२२-२२ च्या खरीप हंगामात बोनस बंद केला. यामुळे धान उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला असून शासनाच्या या निर्णयामुळे शेतकरी वर्गात असंतोष आहे. तरीपण या खरीप हंगामातील बोनस शेतकऱ्यांना देण्यात यावा तसेच २०२२-२३ या खरीप हंगाम पासून नियमित ७०० रुपये बोनस देण्याची मागणी आमदार भोंडेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. आढावा घेऊन शेतकरीहिताचा निर्णय घेण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे आमदार भोंडेकर यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Sarpanch News : सरपंचांचे अधिकार संपले?, फडणवीस सरकारचा निर्णय; मुदत संपलेल्या ग्रामपंचायतींवर प्रशासकांना अधिकार

प्रौढ बेपत्ता झाल्यास आता अपहरणाचा गुन्हा, नवी मुंबईत पहिली कारवाई; सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांची अंमलबजावणी

Leopard Attack Junnar : औषध फवारणीचा पंप ठरला ढाल; बिबट्याच्या हल्ल्यातून शेतकरी दाम्पत्य थोडक्यात बचावले

Marathi News Live Updates : मराठा आंदोलकांनी तहसीलदारांची खुर्ची जाळली

Thane: ९५ टक्के मिळूनही आवडतं कॉलेज नाही, नैराश्यात १७ वर्षीय विद्यार्थ्यानं जीवन संपवलं; घरच्यांना शेवटचा मेसेज पाठवत...

SCROLL FOR NEXT