gondia sakal
विदर्भ

gondia: १२० मुला-मुलींचा एकाच ट्रकमधून प्रवास

आदिवासी आश्रमशाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास केला.

सकाळ डिजिटल टीम

गोंदिया : जिल्ह्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. आदिवासी आश्रमशाळेतील 120 मुला-मुलींना एकाच ट्रकमध्ये कोंबून प्रवास करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. शाळा प्रशासनाच्या या बेजबाबदारपणामुळे जवळपास दहा विद्यार्थी-विद्यार्थिनींची प्रकृती बिघडली आहे. गाडीत श्वास घ्यायला जागा मिळत नसल्याने अक्षरश: काही विद्यार्थी-विद्यार्थींनी बेशुद्ध झाल्या. अखेर गाडीत मोठा गोंधळ उडाल्यानंतर गाडी थेट प्राथमिक आरोग्य केंद्राच्या दिशेला वळवण्यात आली.देवरीचे आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी राचलवार यांनी विद्यार्थी वर उपचार सुरू असून वाहनातील गर्दीमुळे गुदमरल्याने त्यांची प्रकृती खालावल्याचे सांगितले.

ट्रकमध्ये ज्या 120 मुला-मुलींना अक्षरश: कोंबले होते ते गोंदिया तालुका अंतर्गत येत असलेल्या शासकीय आदिवासी शाळा मजितपूर येथील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी आहेत. या सर्वांना कोयलारी या आश्रम शाळेत खेळण्यासाठी घेऊन जाण्यात आलं होतं. तिथून शनिवारी ( ता. २४) रात्री परत येत असताना संबंधित प्रकार घडला. परत असताना काही विद्यार्थी बेशुद्ध पडले आणि गाडीत गोंधळ उडाला.

अखेर गाडी थांबवण्यात आली. तिथे असलेल्यांना समजत नव्हतं. त्यामुळे तातडीन सर्व विद्यार्थ्यांना प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी आणण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांवर सध्या उपचार सुरु आहेत. तर तीन मुलींना उपचारासाठी गोंदिया येथील सामान्य रुग्णालयात हलविण्यात आलं.संबंधित घटनेमुळे गोंदिया जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

खरंतर शाळा प्रशासनाने या गोष्टींचा विचार करायला हवा होता, अशी चर्चा परिसरता सुरु आहे. एकाच गाडीत तब्बल 120 विद्यार्थी आणि विद्यार्थीनींना कोंबनं हे खरंच अतिशय धक्कादायक आहे. त्यामुळे संबंधितांवर प्रशासन काही कारवाई करतं का ते पाहणं महत्त्वाचं ठरेल.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Rain Alert : पुढचे २४ तास महत्त्वाचे मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता

Kasba Ganpati Pune: पुण्यातल्या कसबा गणपती मंडळाकडून दिलगिरी व्यक्त; विसर्जन मिरवणुकीला १३४ वर्षांत पहिल्यांदाच उशीर

IND vs WI : शुभमन गिलची विंडीज मालिकेतून माघार? मोहम्मद सिराजच्या वेगवान चेंडूवर दुखापत; BCCI च्या डॉक्टरांची पळापळ

Nepal PM: संयुक्त राष्ट्रांच्या अधिवेशनात नेपाळच्या पंतप्रधानांची जागतिक व्यवस्थेवर जोरदार टीका; भारताचाही उल्लेख

PM Kisan 24th Installment : पीएम किसानच्या २४व्या हप्ता ऑक्टोबरमध्ये मिळणार? शेतकऱ्यांना प्रतीक्षा; दसऱ्यापूर्वी खात्यात जमा होण्याची शक्यता

SCROLL FOR NEXT