Gondia Crime  sakal
विदर्भ

Gondia Crime : आरोपी पत्नीला जन्मठेपेची शिक्षा...जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल; बाघोली येथील बहुचर्चित हत्याकांड

Gondia Crime : गोंदियाच्या जिल्हा सत्र न्यायालयाने पतीचा खून करून अनैतिक संबंध टिकवण्यासाठी शारदा पारधीला जन्मठेपेची शिक्षा ठोठावली; प्रियकर कुणाल पटले पुराव्याअभावी निर्दोष मुक्त. या बहुचर्चित हत्याकांडाने गावात खळबळ माजवली होती.

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : विवाहबाह्य अनैतिक संबंध टिकविण्यासाठी पतीचा खून केल्याप्रकरणी येथील प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (ता. ३) दिलेल्या निकालात आरोपी पत्नीला जन्मठेपेसह सश्रम कारावास व ५ हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.

तिच्या संशयित आरोपी प्रियकराला पुराव्याअभावी निर्दोष मुक्त करण्यात आले आहे. शारदा मुनेश्वर पारधी (वय २८, रा. बाघोली, ता. तिरोडा) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.बाघोली येथील मुनेश्वर सहेसराम पारधी याची पत्नी आरोपी शारदा पारधी हिचे गावातीलच आरोपी कुणाल मनोहर पटले याचेशी विवाहबाह्य अनैतिक संबंध होते. या संबंधात पती मुनेश्वर अडसर ठरत असल्यामुळे त्याचा कायमचा काटा काढण्यासाठी पत्नी शारदा व तिचा प्रियकर कुणाल या दोघांनी संगनमत करून कट रचला.

दरम्यान, २१ नोव्हेंबर २०२१ रोजी पहाटे ३.३० च्या सुमारास मुनेश्वर झोपेत असताना त्याच्या डोक्यावर व शरीरावर कुऱ्हाडीने वार करून त्याचा खून केला. यावेळी आरोपी शारदाने मृत मुनेश्वरची मावशी सायत्राबाई बाबुलाल बघेले व मावसभाऊ प्रदीप बाबुलाल बघेले यांना फोनद्वारे मुनेश्वरची प्रकृती बरोबर नसल्याचे सांगितले.

मात्र, शरीरावर घाव पाहून व आरोपी शारदाच्या विवाहबाह्य संबंधांविषयी सायत्राबाईला कल्पना असल्याने तिने व तिच्या मुलाने २१ नोव्हेंबर २०२१ रोजी दवनीवाडा पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. यावेळी तत्कालीन तपासी अधिकारी पोलिस निरीक्षक प्रताप भोसले यांनी सविस्तर तपास करून दोन्ही आरोपींविरूद्ध गुन्हा नोंद करीत अटक केली होती. दोन्ही आरोपींच्या विरोधात जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते.

या प्रकरणात आरोपींविरूद्ध दोष सिद्ध करण्यासाठी सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील कृष्णा डी. पारधी यांनी एकूण १४ साक्षदारांची साक्ष नोंदवत इतर कागदोपत्री दस्तऐवज न्यायालयासामोर सादर केले. एकंदरीत आरोपीचे वकील व सरकारी वकील यांच्या सविस्तर युक्तीवादानंतर प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश ए. टी. वानखेडे यांनी आरोपीविरूद्ध सरकारी पक्षाचा पुरावा ग्राह्य धरून आरोपी शारदा मुनेश्वर पारधी हिला जन्मठेपेच्या सश्रम कारावासाची शिक्षा व ५ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास ४ महिन्याचा अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. तर आरोपी कुणाल पटले याला पुराव्यांअभावी निर्दोष मुक्तता केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

LPG Gas Shortage: 'एलपीजी गॅस'ऐवजी 'पीएनजी' कनेक्शन घ्या! केंद्र सरकारचं आवाहन; पुरवठ्यावर परिणाम झाल्याचं मान्य

Private Bus Fire : पुणे-अहिल्यानगर रस्त्यावर रांजणगाव येथे चालत्या खासगी बसने पेट घेतला; सर्व प्रवासी सुरक्षित, मोठी जिवीतहानी टळली

SSC Board Exam : दहावी बोर्ड परीक्षेत गणिताची प्रश्नपत्रिका ‘लीक’ झाल्याचा बनाव; पोलिस तपासात विद्यार्थ्यांची फसवणूक झाल्याचे आले समोर

Strait of Hormuz: भारताचं टेन्शनच जाणार! इराणकडून भारतीय जहाजांना मिळणार सुरक्षित मार्ग; राजदूतांनी दिले स्पष्ट संकेत

Flight Ticket: मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! प्रवाशांना मोठा झटका; विमान तिकिटे महागणार, नवे दर किती अन् कधीपासून?

SCROLL FOR NEXT