नवेगावबांध : डब्याला आग लागल्याच्या अफवेने रेल्वेगाडी रिकामी करताना प्रवासी.
नवेगावबांध : डब्याला आग लागल्याच्या अफवेने रेल्वेगाडी रिकामी करताना प्रवासी. 
विदर्भ

लोकल रेल्वेतून प्रवाशांनी अचानक मारल्या उड्या...हे आहे कारण

सकाळ वृत्तसेवा

नवेगावबांध (जि. गोंदिया) : सोमवारी (ता. 9) सकाळी 10:30 वाजताची वेळ. बल्लारशा-गोंदिया (क्रमांक 58803) ही रेल्वेगाडी गोंदियाला जाण्यासाठी मालगाडी क्रॉसिंगवर असल्यामुळे देवलगाव रेल्वेस्थानकावर उभी होती. अचानक डब्याला आग लागल्याची आरडाओरड सुरू झाली.

आरडाओरडा ऐकताच रेल्वेगाडीत निवांत बसलेल्या शेकडो प्रवाशांनी रेल्वे डब्याखाली उड्या मारल्या. जो तो जिवाच्या आकांताने डब्यातून उतरून पळू लागला.

आग लागल्याची केवळ अफवा

या सर्व गोंधळात नेमकं काय झालं हेच प्रवाशांच्या ध्यानी येईना. जो-तो प्रवासी जीव मुठीत घेऊन पळू लागला. क्षणभरात पूर्ण रेल्वेगाडी रिकामी झाली. गोंधळलेले प्रवासी सावरल्यानंतर नेमका प्रकार लक्षात आला. डब्याला कुठेही आग लागली नव्हती. आग लागल्याची केवळ अफवा होती. हे नंतर प्रवाशांच्या लक्षात आले.

अनेकांच्या सामानावर चोरट्यांनी मारला हात

परंतु या रेल्वेगाडीत नियमितपणे प्रवास करणाऱ्या चोरट्यांनी मात्र या धांदलीचा फायदा घेऊन अनेकांच्या सामानावर हात साफ केले. जिवाच्या आकांताने उड्या मारताना काही प्रवाशांना हा थरार घडताना पायाला किरकोळ जखमा झाल्या होत्या. शेकडो प्रवासी यात किरकोळ जखमी झाले. महिला व लहान मुलांचे भीतीमुळे बेहाल झाले होते. या सर्व प्रकाराबाबत एकूणच रेल्वे प्रशासन मात्र अनभिज्ञ होते. गहाळ झालेले सामान प्रवाशी शोधू लागले. काहींचे मिळाले, तर बऱ्याच प्रवाशांचे सामान गहाळ झाले होते.

जाणून घ्या : मती मारली गेली आणि पायावर बेतले

प्रवाशांना चांगलाच मनस्ताप

देवलगाव रेल्वेस्थानकावर मात्र घडलेल्या प्रकारामुळे तसेच भीतीमुळे नवेगावबांध व परिसरातील काही प्रवाशांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला. या गोंधळामध्ये मात्र शेकडो प्रवाशांचा सामान गहाळ झाल्याच्या तक्रारी आहेत. होळीच्या सणानिमित्त छत्तीसगड, मध्य प्रदेश या राज्यातील प्रवासीदेखील या रेल्वेगाडीत होते. त्यांचेही बरेच नुकसान झाल्याचे समजते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Lok Sabha Election 2024 Phase 3 Updates: देशभरात तिसऱ्या टप्प्यात 60.74 तर महाराष्ट्रात 53.90 टक्के मतदान

Explained: EVM जाळल्यावर, तोडफोड केल्यावर शिक्षा काय? निवडणूक आयोगाचे कडक कायदे जाणून घ्या...

ECI Directs X : भाजपची 'ती' आक्षेपार्ह पोस्ट तातडीनं हटवा! निवडणूक आयोगाचे ट्विटरला आदेश

Latest Marathi News Live Update : नांदेडमध्ये गोळीबार करत हल्लेखोर पैसे घेऊन पसार

Suryakumar Yadav Video: प्रेम हे! शतक करत मुंबईला जिंकवल्यानंतर सूर्याचा मैदानातून स्टँडमध्ये बसलेल्या पत्नीला व्हिडिओ कॉल

SCROLL FOR NEXT