अर्जुनी मोरगाव : सीडी वर्क केलेल्या कामामुळे बाहेर उखडून पडलेली गिट्टी.
अर्जुनी मोरगाव : सीडी वर्क केलेल्या कामामुळे बाहेर उखडून पडलेली गिट्टी. 
विदर्भ

याला राज्य महामार्ग म्हणावा का?...प्रवास करा सांभाळून

संतोष रोकडे

अर्जुनी मोरगाव (जि. गोंदिया) : गेल्या दोन-तीन वर्षांपासून या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. जागोजागी रस्ता उखडलेला असून गिट्टी बाहेर आली आहे. मार्गाच्या दुरुस्तीसाठी 18 डिसेंबर 2018 ला राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने या राज्यमार्गावर झाडे लावून तसेच टायर जाळून आंदोलन करण्यात आले होते.

त्याचा धसका घेत सार्वजनिक बांधकाम विभागाने काही ठिकाणी गिट्टी टाकून व मुरमाचा लेप देऊन या रस्त्याची डागडुजी केली. मात्र काम न झाल्याने या रस्त्याची दैन्यावस्था झाली आहे.

रस्त्यावर फूट-दीड फूट खोल खड्डे

या रस्त्यावर फूट-दीड फूट खोल खड्डे पडले असून अनेकदा अपघातसुद्धा घडले आहेत. गोंदिया-गोरेगाव, नवेगावबांध-अर्जुनी मोरगाव यादरम्यान काही ठिकाणी या रस्त्याची कामे झाली; तर काही ठिकाणी रस्ता बांधकाम बाकी आहे. काही ठिकाणी सीडी वर्क बांधकाम करण्यात आले. हे बांधकाम करताना रस्ता खोदण्यात आला; त्याचीसुद्धा गिट्टी बाहेर निघालेली आहे. त्यामुळे प्रवाशांना त्रास होत आहे.

काम कासवगतीने सुरू

सिडी वर्कचे काम झाल्याने आतातरी रस्त्याचे पूर्णकाम होईल, अशी आशा होती. मात्र, अनेक दिवसांपासून काम कासवगतीने सुरू होते व आता तर ते पूर्ण बंद आहे. त्यामुळे या वर्षीच्या पावसाळ्यातसुद्धा फुटलेल्या रस्त्यावरूनच जनतेला ये-जा करावी लागणार आहे.

पुढच्या वर्षीपर्यंत रस्ता बांधकाम पूर्ण
यावर्षी या रस्त्याचे पूर्ण बांधकाम होणे मुश्‍कील आहे. तरीही आम्ही प्रयत्न करीत आहोत. पुढच्या वर्षीपर्यंत रस्ता बांधकाम पूर्ण करून देण्याचा अवधी आहे.
- विजय सोनुने, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग, अर्जुनी मोरगाव.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jharkhand Politics : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अन् मंत्री आलमगीर आलम यांना अटक; सचिवाच्या नोकराकडे सापडले होते ३७ कोटी

Latest Marathi News Live Update : पंतप्रधानांच्या रोड शोला मुंबईकरांचा तुफान प्रतिसाद

Jintur Crime : चाकूने भोसकून गंभीर जखमी झालेल्या ३६ वर्षीय तरुणाचा मृत्यू; दोन अटकेत, जिंतूर शहरातील घटना

IPL 2024 RR vs PBKS Live Score: राजस्थानला दुसरा धक्का! जैस्वाल पाठोपाठ संजू सॅमसनही स्वस्तात बाद

Kalyan Loksabha election 2024 : कल्याणच्या सभेत मोदींनी उपस्थित केला सावरकरांचा मुद्दा; राहुल गांधींना दिलं 'हे' चॅलेंज...

SCROLL FOR NEXT