नागभीड : रेल्वेला निरोप देताना प्रवासी.  
विदर्भ

106 वर्षांच्या नागपूर-नागभीड रेल्वेला निरोप 

भोजराज नवघडे

नागभीड (चंद्रपूर) : स्वातंत्र्यपूर्व काळापासून ते आजपर्यंत तब्बल 106 वर्षे अव्याहतपणे जनतेच्या सेवेत असलेली मध्य भारतातील शेवटची नागभीड-नागपूर ही नॅरोगेज ट्रेन सोमवारी (ता. 25) पासून बंद होणार आहे. सुमारे 109 किलोमीटरच्या ब्रॉडगेज प्रकल्पाला मान्यता मिळाल्यामुळे हा नॅरोगेज मार्ग बंद करण्यात येत आहे. 
जिल्हा परिषद सदस्य तथा झेडआरयुसीसी सदस्य संजय गजपुरे यांच्या पुढाकारातून रविवारी नागभीड रेल्वेस्थानक परिसरात या रेल्वेला निरोप देण्यात आला. अध्यक्षस्थानी खासदार अशोक नेते होते. यावेळी नागभीडचे नगराध्यक्ष प्रा. डॉ. उमाजी हिरे, संजय गजपुरे, भाजप तालुकाध्यक्ष होमदेव मेश्राम, व्यापारी संघाचे गुलझार धम्मानी, नगर परिषद उपाध्यक्ष गणेश तर्वेकर, हनिफ भाई ज्यादा, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती अवेश पठाण, नगरसेवक सचिन आकुलवार, डीआरयुसीसी सदस्य संजय बारापात्रे, गोवा येथून आलेले विजय अभ्यंकर उपस्थित होते. 

 शेवटचा प्रवासासाठी एकच गर्दी

नागभीड-नागपूर ब्रॉडगेजसाठी प्रयत्न केल्याबद्दल खासदार अशोक नेते यांचा संजय गजपुरे, नागभीड व्यापारी संघ, नगर परिषद नागभीडच्या वतीने सत्कार करण्यात आला. तसेच गाडीचे लोको पायलट रमन एम, गार्ड पी. रॉय, सहाय्यक लोकोपायलट प्रशांत सहारे यांचा खासदार अशोक नेते, संजय गजपुरे, व्यापारी संघाच्या वतीने सत्कार करण्यात आला. यावेळी गाडीच्या रेल्वे इंजिनला हारांनी सजविण्यात आले. परिसरातील अनेकांनी या गाडीतून शेवटचा प्रवास करण्यासाठी एकच गर्दी केली होती. अनेकांनी या गाडीच्या प्रवासातील आपले अनुभव कथन केले. खासदार अशोक नेते यांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले. प्रास्ताविक संजय गजपुरे यांनी केले. संचालन पराग भानारकर यांनी, तर आभार गणेश तर्वेकर यांनी मानले. 

भारतातील सर्व नॅरोगेज ट्रेनने प्रवास व अभ्यास करण्याचा माझा छंद आहे. नागभीड रेल्वे स्टेशन अतिशय सुंदर आहे. तसेच सर्वांत जुन्या स्थानकापैकी एक आहे. 
- विजय भास्कर अभ्यंकर (गोवा) ,अभ्यासक, नॅरोगेज ट्रेन मार्ग 


नागभीड-नागपूर या नॅरोगेज ट्रेनला निरोप देताना दु:ख होत आहे. तर, दुसरीकडे आनंदसुद्धा होत आहे. कारण याच मार्गाने ब्रॉडगेज रेल्वे येत्या दोन वर्षांत धावणार आहे. 
-संजय गजपुरे,झेडआरयुसीसी सदस्य, नागभीड 


ही ऐतिहासिक ट्रेन आहे. या गाडीने प्रवास करण्याची इच्छा होती. त्यामुळे आज संपूर्ण परिवारासोबत प्रवास करीत आहे. हा प्रवास अत्यंत आनंददायी असा आहे. 
- ओम मेश्राम, प्रवासी, नागभीड 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jammu-Kashmir Assembly: जम्मू-काश्मीरला पूर्ण राज्याचा दर्जा? विधानसभेत ठराव मंजूर, भाजपचा सभात्याग! काय बदल होणार?

Ladki Bahin Yojana ₹1500 Installment : लाडक्या बहिणींच्या खात्यात 3000 ऐवजी किती पैसे जमा झाले? घरबसल्या मोबाईलवर मिनिटांत तपासा रक्कम; कशी पाहाल स्टेटस?

Udaipur ₹2 Crore Bribery Case : एसीबीच्या जाळ्यात सापडला मोठा मासा? तब्बल 2 कोटी रुपयांची घेतली लाच; एसओजी अधिकाऱ्याच्या नावाने पैसे घेणारा दलाल जाळ्यात

Latest Marathi News Live Update: गुंज परिसरात पिसाळलेल्या कुत्र्याचा धुमाकूळ; ३० जणांना चावा

रेसलिंग विश्वावर शोककळा! सामना खेळल्यानंतर दुसऱ्याच दिवशी ४० वर्षांच्या WWE स्टार PAC चे निधन

SCROLL FOR NEXT