tolnaka 
विदर्भ

गुड न्यूज; 1 डिसेंबरपासून टोलटॅक्‍स होणार कॅशलेस 

रमेश दुरुगकर

साकोली (जि. भंडारा) : महामार्गावर टोलटॅक्‍स भरण्यासाठी लागणाऱ्या वाहनांच्या रांगांमुळे वेळेचा अपव्यय होऊन मनस्ताप सोसावा लागत होता. परंतु, आता यापुढे राष्ट्रीय महामार्गावर धावणाऱ्या सर्व वाहनांना टोलटॅक्‍स जमा करण्याकरिता रांगेत लागण्याची व वाट पाहण्याची गरज पडणार नाही. 1 डिसेंबरपासून टोल नाक्‍यावर कॅशलेस प्रणालीची अंमलबजावणी होणार आहे. 

वाहनांवर लागणार चिप 
भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणअंतर्गत येणारे टोल नाके 1 डिसेंबरपासून कॅशलेस करण्याची तयारी सुरू करण्यात आलेली आहे. सध्या प्रायोगिक स्वरूपात प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. याकरिता एनएचएआय नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करण्यात येत आहे. याचा वापर करण्याकरिता वाहन मालकांना (फास्ट टॅग) चिप खरेदी करून आपल्या वाहनांवर लावणे गरजेचे आहे. 

स्कॅनर  करणार चिप स्कॅन
चिप लागलेल्या वाहनांना टोल प्लाझावर पोहोचताच तिथे लागलेले स्कॅनर चिप स्कॅन करेल. त्यानंतर टोल प्लाझाचे गेट आपोआप उघडले जाईल. या तंत्रज्ञानामुळे वाहनमालकाच्या बॅंक खात्यातून आवश्‍यक राशी कपात करण्यात येईल. त्यामुळे मोक्‍यावर कॅश देण्याची गरज पडणार नाही. 

केंद्र सरकारचा निर्णय 
टोल नाक्‍यांवर चारचाकी वाहन व जड वाहनांच्या रांगा लागत असल्यामुळे तेथून निघणे त्रासदायक असते. ही समस्या लक्षात घेता केंद्र सरकारने नवी दिल्ली येथे उच्चस्तरीय बैठकीमध्ये राज्य शासनाला ही प्रणाली राबविण्याबाबत सूचना केली होती. 

अडीच टक्के कॅशबॅक 
प्राप्त माहितीच्या आधारे एनएचएआय यावर अडीच टक्के कॅश बॅक देईल. त्यामुळे नेहमी जाणे-येणे करणाऱ्या वाहनधारकांना निश्‍चितच फायदा होईल. चिल्लर पैशासाठी होणारे वादविवादसुद्धा यामुळे होणार नाहीत. सहापदरी आणि चौपदरी रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना रस्त्याच्या बांधकामामुळे देखभाल दुरुस्तीमध्ये लागणारा खर्च अनेक ठिकाणी लागलेल्या टोल प्लाझावर टॅक्‍स भरून जमा करावा लागत होता. त्यासाठीची कटकट आता कमी होणार आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

Samarth Movie Review: मनाचे श्लोक, अध्यात्म अन् बाप-लेकाचा संघर्ष; विचार करायला लावणारा 'समर्थ'; कसा आहे चित्रपट?

SCROLL FOR NEXT