संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

अमरावतीकरांसाठी ‘गुड न्यूज', 'पीडीएमसी'तील प्रयोगशाळा कार्यान्वित

सुधीर भारती

अमरावती : आता अमरावतीकरांनी घाबरण्याची गरज नाही. कारण जिल्ह्यात आणखी एक कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठापाठोपाठ आता डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातही कोरोना चाचणी प्रयोगशाळा कार्यान्वित झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग येईल, असे प्रतिपादन पालकमंत्री ऍड. यशोमती ठाकूर यांनी केले.


डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयात कोविड-१९ परीक्षण प्रयोगशाळेचे उद्‌घाटन पालकमंत्री श्रीमती ठाकूर यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. श्रीशिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्‍यामसुंदर निकम, संस्थेचे पदाधिकारी व अधिकारी- कर्मचारी या वेळी उपस्थित होते. या प्रयोगशाळेमुळे जास्तीत जास्त टेस्ट्‌स करता येतील. चाचणी अहवाल लवकर प्राप्त झाल्याने रुग्णांवर त्वरित उपचार करता येतील व कोरोना नियंत्रण उपाययोजनांना गती येईल, असा विश्‍वास पालकमंत्र्यांनी या वेळी व्यक्त केला.

कोरोना प्रतिबंधासाठी रुग्णांची तपासणी तत्काळ होणे खूप गरजेचे असते. सुरुवातीला अमरावती येथे लॅब नसल्यामुळे येथील संशयितांचे थ्रोट स्वॅब नागपूर, अकोला, वर्धा येथे पाठविण्यात येत होते. ही अडचण लक्षात घेऊन पालकमंत्र्यांनी संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ व त्यानंतर डॉ. पंजाबराव देशमुख वैद्यकीय महाविद्यालयातील प्रयोगशाळेसाठी निधी मिळवून दिला. लॅबमध्ये चार तज्ज्ञ व सहा तंत्रज्ञ आहेत. त्यांचे प्रशिक्षण झाले आहे. त्याशिवाय इतर पाच मदतनिसांचा स्टाफ आहे. तीन पाळ्यांमध्ये ही यंत्रणा काम करेल. दर दिवशी साधारणतः ९६ अहवाल प्राप्त होतील, अशी माहिती महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. पद्माकर सोमवंशी यांनी दिली. ही कायमस्वरूपी तरतूद असून, अद्ययावत सुविधा अमरावतीसाठी मोठी उपलब्धी झाली आहे, असेही त्यांनी सांगितले.

संपादन - नरेश शेळके

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पक्षात खदखद! नेतृत्वावर थेट प्रश्न अन्...; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याची भावनिक पोस्ट चर्चेत, काय म्हणाले?

जमीन, जागेची खरेदी-विक्री आता कोणत्याही तालुक्यात! खरेदी-विक्री व्यवहारातून राज्याच्या तिजोरीत ५८,६७३ कोटी; ३१ मार्चपर्यंत सुट्टीतही सुरु राहणार कार्यालये

सोने-चांदीच्या भावात अचानक वाढ! युद्धानंतर सुरू असलेल्या घसरणीला ब्रेक, सोनं ५५००ने तर चांदी ११००० रुपयांनी महाग

Karad News : कऱ्हाड - चिपळुण मार्गावरील अवजड वाहतुक बंद; महामार्गाच्या कामासाठी दोन महिने वाहतुकीत बदल

खरातचं कुटुंब परदेशात पलायनाच्या तयारीत? पतीचे कोट्यवधींचे व्यवहार माहिती नाहीत, पत्नीची भूमिका संशयाच्या भोवऱ्यात

SCROLL FOR NEXT