Coins Sakal
विदर्भ

गोरेगाव : भिंतीतुन मिळाले २९४ पांढ-या धातुचे सिक्के

जुने मातीचे घर फोडण्याचे काम चालू असतांना भिंतीतुन टिनाची जिर्ण पेटी दिसली. ती पेटी बाहेर काढताच सिक्के आढळुन आले.

डिलेश्वर पंधराम

गोरेगाव (जि. गोंदिया) - तालुक्यातील बोटे या गावी प्रभाबाई शहारे वय ७० वर्षे, यांचे जिर्ण जुने मातीचे घर फोडण्याचे काम चालू असतांना भिंतीतुन टिनाची जिर्ण पेटी दिसली. ती पेटी बाहेर काढताच सन १८९० ते १९५० वर्ष लिहलेले व प्रिस नावाचे १ रुपयांचे २९४ पांढ-या रंगातील धातुचे सिक्के( ता ०३ आक्टोबर) आढळून आले. हे सिक्के खासगी घराच्या भिंतीत आढळुन आल्याने पोलीसात तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. परंतु, लाला शहारे यांनी शनिवारी (ता. १६) पोलीसात सिक्के मिळाल्याची तक्रार दाखल करताच तत्काळ पोलिसांनी २९४ सिक्के जप्त केले आहेत.

प्रभाबाई शालीकराम शहारे, वय ७० वर्ष, बोटे यांनी दिलेल्या माहितीनुसार जावई चंद्रशेखर अंताराम नंदेश्वर यांना घरकुल मंजुर झाल्याने घरकुलाचे बांधकाम जुने मातीचे घर सोडून उर्वरित जागेत घरकुलाचे बांधकाम पूर्ण केले. जुने जिर्ण असलेले मातीचे घर घरकुलाच्या समोर असल्याने हे घर पाडण्यासाठी ललित राऊत, संजय राऊत यांना कंत्राटीवर काम दिले. त्यांनी ता. ०३ आक्टोबरला जुने घर पाडण्याच्या कामाला सुरुवात केली. घर कौलारू असल्याने इमला साहीत्य काढले. व भिंती पाडण्याचे काम सुरू केले. त्यादरम्यान जमिनीपासून ५ फुट वरच्या भागातील भिंतीत एक जिर्ण टिनाची पेटी या मजुरांना दिसली. त्यांनी चंद्रशेखर नंदेश्वर यांना या पेटीची माहीती दिली. चंद्रशेखर नंदेश्वर यांनी भिंतीतुन पेटी बाहेर काढताच सिक्के खाली पडले. ते सिक्के पांढ-या रंगाचे (धातुचे)असुन त्यावर प्रिस १ रुपया इण्डिया सन १८९० ते १९५० या वर्षातील आढळले. त्यातील एका सिक्याचा वजन केल्यावर १० ते १२ ग्राम वजनाचे भरले. हे सिक्के पांढ-या रंगाचे असल्याने चांदीचे सिक्के मिळाल्याची चर्चा बोटे गावात पसरली.

परंतु, सिक्के मिळाल्याची माहिती पोलीसात देण्यात आली नव्हती. पांढ-या रंगाचे जुने सिक्के मिळाल्याची माहिती नागपूर निवासी लाला कान्हु शहारे यांना होताच वाटणीत हिस्सा घेण्याकरीता बोटे या गावी आला. ते सिक्के २९४ नसुन ६०० आहेत. उर्वरीत सिक्के दाखव असा तगादा चंद्रशेखर नंदेश्वर यांना लाला शहारे यांनी लावला, असता जुने घर पाडण्याचे काम करणाऱ्या ललीत राऊत, संजय राऊत यांना बोलावून विचारणा करण्यात आली. परंतु लाला शहारे यांचे समाधान झाले नाही. त्यामुळे त्यांनी शनिवारी (ता. १६) चंद्रशेखर नंदेश्वर यांच्या विरोधात गोरेगाव पोलीसात तक्रार दाखल केली. पोलीसांनी तत्काळ कार्यवाही करीत चंद्रशेखर नंदेश्वर यांच्याजवळील २९४ सिक्के जप्त केले. पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

सिक्के १८९० ते १९५० या वर्षातील असल्याने ते चांदीचेच असावे. आजच्या बाजार भावाप्रमाणे लाखांच्या जवळपास किंमतीचे आहेत. असी चर्चा परिसरात होत आहे. नेमके हे कोणत्या धातुचे आहेत हे तपासणी झाल्यानंतर माहीती मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Government Job: एकाच पदासाठी वेगवेगळ्या परीक्षा नको, शुल्कही वाचणार! मंत्री शेलार यांची विधानसभेत माहिती

Mobile App to Predict Cancer Risk: कर्करोगाचा अंदाज आता मोबाईलवर! टाटा रुग्णालयातील संशोधकांची निर्मिती; जोखमीचे मूल्यांकन शक्य

Pune University flyover: पुण्यातील विद्यापीठ चौकाच्या उड्डाणपुलावरुन जाताना उडतोय गोंधळ; अर्धवट कामामुळे अपघाताचा धोका

उन्हाचा तडाखा वाढला! दिवसभरात प्या ४ लिटर पाणी, जिल्हा रुग्णालयात उष्माघात कक्ष, नागरिकांनी लहान मुलांची, ज्येष्ठांची कशी घ्यावी काळजी? वाचा...

Akola News : टी-२० विजयाच्या जल्लोषानंतर अकोल्यात तणाव; दोन गटात वादः वाहनांची तोडफोड, दगडफेकीत नुकसान

SCROLL FOR NEXT