वानाडोंगरी - चादरी लावून झाकलेल्या खिडक्‍या. 
विदर्भ

खिडक्‍यांना चादरी बांधून झोपतात मुली

विनायक इंगळे

वानाडोंगरी - 'बेटी बचाओ,  बेटी पढाओ’ असा सर्वत्र नारा गाजत असताना या कडाक्‍याच्या थंडीत शासनाच्या भरवशावर स्वतःच्या मायबापांना व घरादारांना सोडून शिक्षणासाठी आलेल्या या सावित्रीच्या लेकी थंडीमुळे बेजार झालेल्या आहेत. अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळेच्या वस्‍तीगृहात खिडक्‍यांना चादरी बांधून रात्रभर थंडीत झोपून दिवस निघण्याची वाट बघतात.

शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेसमोर नव्याने तयार झालेल्या निकृष्ट दर्जाच्या इमारतीमध्ये अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सुरू झाली आहे. परंतु, त्या निवासी वसतिगृहातील खिडक्‍यांना तावदाने नाहीत. अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा सन-२०११ मध्येच सुरू होणे गरजेचे होते. पण, पुरेशी व्यवस्था नसतानाही समाजकल्याणमंत्र्यांच्या आग्रहाखातर जून महिन्यात सुरू होणारी शाळा ऑक्‍टोबर २०१८ मध्ये सुरू करण्यात आली. 

सध्या एकूण १७ मुली शिक्षण घेत आहेत. निवासी वसतिगृहात खोल्यांना दारं आहेत. पण, दारांना कड्या नाहीत. संपूर्ण खिडक्‍यांना तावदाने नाहीत. मैदानावर काटेरी झाडे झुडपी वाढलेली आहेत. सरपटणारे  प्राणी कधीही आत शिरू शकतात. पुरेशी सुरक्षा व्यवस्था व साधनसामग्रीची गरज आहे. तेव्हा संबंधित अधिकारी व पदाधिकाऱ्यांनी दखल घेऊन निवासी मुलींना त्रास होणार नाही, याची  काळजी घेण्याची मागणी होत आहे.

वसतिगृहाचे बांधकाम निकृष्ट
‘शासकीय काम आणि घडीभर थांब’ या वसतिगृह व शाळेच्या इमारतीच्या बांधकामाची जबाबदारी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडे आहे. निवासी वसतिगृहातील बांधकाम हे अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे. भिंतीवर एक खिळा जरी ठोकला तर भरभर वाळू सांडते. ही इमारत या निकृष्ट दर्जामुळे आजपर्यंत हस्तांतरित झाली नाही.

या समस्यांची माहिती संबंधित अधिकाऱ्यांना दिलेली आहे. ते तातडीने पूर्ण करणार आहेत.
- स्नेहल शंभरकर, मुख्याध्यापिका

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IndiGo Flight Crisis : इंडिगोची आजही ४५० उड्डाणे रद्द, भारताच्या हवाई इतिहासातील सर्वात मोठे संकट कधी संपणार ?

Wani Accident : भीषण अपघात: वणी गडावरील भवरीनाला येथे इनोव्हा ९०० फूट दरीत कोसळली; सहा भाविक जागीच ठार, घाट सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

भारतात होणाऱ्या T20 World Cup 2026 पूर्वी आयसीसीसमोर उभं राहिलं संकट; चाहत्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी

Nagpur News : ‘इंडिगो’ने आमदार, मंत्र्यांना आणले ‘जमिनी’वर; अधिवेशनासाठी अनेकांचा रस्त्याने प्रवास

Video : शापित विमानतळ! तीन वर्षात पडलं बंद, आता पक्षीही फिरकत नाही; काय आहे रहस्य?

SCROLL FOR NEXT