government of state is unfit said leader of the opposition Radhakrishna Vikhe Patil
government of state is unfit said leader of the opposition Radhakrishna Vikhe Patil  
विदर्भ

राज्यातील सरकार 'अनफिट'; विखे पाटीलांनी डागली तोफ

सकाळवृत्तसेवा

नागपूर - गेल्या चार वर्षात सरकारकडे कुठलेही नियोजन नाही. सर्वच आघाड्यांवर राज्यातील सरकार अपयशी ठरले आहे. प्रसिद्धीसाठी 'फिटनेस चॅलेज'चा स्टंट करणारे सरकार शेतकऱ्यांना कर्जमाफी, कर्जवाटप, रोजगार देण्यात अपयशी ठरले. एकूणच राज्यातील सरकार 'अनफिट' असून 'एक्‍सायरी डेट' ठरल्याचे नमुद करीत विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारच्या चहापानावर बहिष्कार टाकत असल्याचे सांगितले. 

पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला विरोधी पक्षातर्फे आयोजित संयुक्त पत्रकारपरिषदेत ते बोलत होते. कर्जमाफी योजनेला नाव छत्रपती शिवाजी महाराजांचे मात्र या योजनेतून सरकारने फसवणूक केल्याचा आरोप करीत ते पुढे म्हणाले, कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांनी अटी व शर्तींमध्ये अडकवून ठेवले. खरीप हंगामासाठी आतापर्यंत केवळ 18 टक्के कर्ज वाटप करण्यात आले. सरकारच्या धोरणामुळे बॅंक अधिकारी मस्तावले असून बुलढाण्यानंतर दारव्ह्यातील घटनेने अधोरेखित केले. शेतकऱ्यांची लूट करण्याचा परवाना सरकारने बॅंकांना दिला. पंतप्रधानांनी दत्तक घेतलेल्या गावात शेतकरी आत्महत्या करतात, यापेक्षा सरकारवर मोठी नामुष्की कोणती? असा खोचक सवालही त्यांनी उपस्थित केला. भ्रष्टाचारातील मंत्र्यांना मुख्यमंत्री क्‍लिन चिट देत आहे. नाणार प्रकल्प जाणार, असे उद्धव ठाकरे म्हणाले. परंतु नाणार गेला नाही, यात सेनेची अब्रू गेली, असा टोलाही त्यांनी हाणला. भाजप सरकार केव्हाच गेले असते, परंतु शिवसेनेमुळेच ते तरल्याचे ते म्हणाले. आरक्षण, रोजगाराबाबत सरकारने फसव्या घोषणा केल्या. आता सरकारने अशा अफवा पसरविणे बंद कराव्या अन्यथा जनता झोडपून काढेल, असा इशाराही त्यांनी दिला. बीडमध्ये पाच जणांचा खूनामुळे कायदा व सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचे चित्र आहे. मुंबईचा विकास आराखडा बिल्डर धार्जिणा असल्याची टिकाही त्यांनी केली. पत्रकारपरिषदेत विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, आमदार विजय वडेट्टीवार, आमदार प्रा. जोगेंद्र कवाडे, आमदार प्रकाश गजभिये, आमदार हेमंत टकले, अतुल लोंढे आदी उपस्थित होते. 

सिडकोतील भ्रष्टाचाराप्रकरणी मुख्यमंत्र्यांकडे सुई -

सिडकोमध्ये झालेला भ्रष्टाचार गंभीर आहे. ज्या गतीने हा व्यवहार झाला, त्यामुळे संशयाची सुई मुख्यमंत्र्यांवर जाते, असा घणाघात करीत विखे पाटील यांनी यासंबंधातील कागदपत्रे सभागृहात मांडणार असल्याचे सांगितले. 



आपण एका क्लिकवर ताजे अपडेट्स आपल्या मोबाईलमध्येही मिळवू शकता.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde : जागावाटपाच्या ‘तिढ्या’वर चर्चा ; कोल्हापूर दाैऱ्यात शिंदेंच्या भेटीगाठी

Fact Check: उद्धव ठाकरेंना काँग्रेस कार्यकर्ते बोलू देत नसल्याचा दावा खोटा; प्रचार सभेतील अर्धवट व्हिडिओ व्हायरल

'नाष्ट्याला राजकारणी खातो' म्हणणारे TN शेषन काँग्रेसकडून होते निवडणुकीच्या रिंगणात; भाजपच्या दिग्गज नेत्याला दिलं होतं आव्हान

IPL 2024: राजस्थानची प्लेऑफच्या दिशेने घौडदौड, तर मुंबईच्या अडचणी वाढल्या; जाणून घ्या पाँइंट्स - टेबलची स्थिती

Latest Marathi News Live Update : राहुल गांधींनी छत्रपती शिवाजी महाराज, राणी चन्नम्मांचा अपमान केला, बेळगावात मोदींचा घणाघात

SCROLL FOR NEXT