gram_panchayat. 
विदर्भ

ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्तीस सरकार ठाम, अधिसूचना जारी!

नीलेश डोये

नागपूर : ग्रामपंचायतींवर पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकाची नियुक्ती करण्याचा निर्णय सरकारने घेतला. याला अनेकांनी विरोध दर्शविला असून न्यायालयात आव्हानही देण्यात आले. मात्र सरकार आपल्या निर्णयावर ठाम असून सरकारने तशी अधिसूचनाच काढली आहे.

कोरोनामुळे राज्यातील 12 हजारांवर ग्राम पंचायतीच्या निवडणुका घेता येणार नसल्याने त्या पुढे ढकलण्याचा निर्णय सरकारने घेतला. गावात कोरोनाच्या नियंत्रणाची जबाबदारी सरपंच आणि ग्रामसेवकावर आहे. ग्रामपंचायतीच्या निवडणुका चार, सहा महिने होणार नसल्याचा अंदाज आहे.

ग्रामपंचायतच्या कारभारावर परिणाम होता कामा नये म्हणून सरकारने प्रशासक नियुक्त करण्याचा निर्णय घेतला. या प्रशासकाची नियुक्ती जिल्हा परिषदच्या सीईओंना करायची आहे. परंतु ही नियुक्ती जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने करायची आहे. गावातील रहिवाशी आणि मतदार यादीत नाव असलेल्या कोणत्याही व्यक्तीची नियुक्त यावर करता येणार आहे. प्रशासक सरकारच्या मर्जीतील व्यक्ती असल्याने या राजकीय नियुक्‍ती ठरणार असल्याचा आरोप विरोधकांचा आहे.

त्यामुळे सरकारच्या या निर्णयाचा विरोध करण्यात येत आहे. प्रशासक नियुक्तीसाठी काही राजकीय पक्षांकडून अर्ज मागविण्यात आले. यासोबत देणगी मागण्यात येत असल्याचे प्रकार समोर आले होते. यावर चांगलाच वादंग उठला. सरकारच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान देण्यात आले. न्यायालयाने याला स्थगिती दिली. विरोध पाहता सरकार निर्णय बदलणार असल्याची शक्‍यता वर्तविण्यात येत होती. परंतु सरकार आपल्या निर्णयावर ठाम असल्याचे दिसते. पालकमंत्र्यांशी सल्लामसलत करूनच सीईओंनी प्रशासकाची नियुक्ती करण्याबाबची अधिसूचना 27 जुलैला अतिरिक्त मुख्य सचिव अरविंद कुमार यांनी काढली आहे.

वादावर अंतिम निर्णय घेणार ग्राम विकास विभाग
संबंधित प्रशासकाकडून गैरवर्तन झाल्यास त्याला पदावरून दूर करण्याचा अधिकार सीईओंना असणार आहे. संबंधित प्रशासकास सीईओंच्या आदेशाला पंधरा दिवसांच्या आत विरोध करता येणार आहे. नियुक्तीवरून कोणताही वाद किंवा तांत्रिक अडचण निर्माण झाल्यास त्यावर अंतिम निर्णय घेण्याचे अधिकार ग्राम विकास विभागाला देण्यात आले आहेत.

संपादन - स्वाती हुद्दार

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT