Governor Koshyari said Gondwana University should start a self reliant India
Governor Koshyari said Gondwana University should start a self reliant India 
विदर्भ

राज्यपाल कोश्‍यारी म्हणाले, आत्मनिर्भर जीवन आदिवासी जगतात; गोंडवाना विद्यापीठाने आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावी

सकाळ डिजिटल टीम

गडचिरोली : आत्मनिर्भर भारताची सुरुवात आदिवासी भागातून झाली पाहिजे. कारण, खऱ्या अर्थाने आत्मनिर्भर जीवन आदिवासी जगत असतात. या दृष्टिकोनातून गोंडवाना विद्यापीठाने गोंडवानाचा प्रदेश कशाप्रकारे आत्मनिर्भर बनवता येईल यासाठी प्रयत्न करावा. या भागातून आत्मनिर्भर भारताची सुरुवात करावी, असे आवाहन राज्यपाल तथा कुलपती भगतसिंग कोश्‍यारी यांनी गुरुवारी केली.

गोंडवाना विद्यापीठाच्या आठव्या ऑनलाइन दीक्षांत सोहळ्यात ऑनलाइन मार्गदर्शन करताना ते अध्यक्षस्थानाहून बोलत होते. यावेळी राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद बंगलोरचे संचालक डॉ. एस. सी. शर्मा, विद्यापीठाचे कुलगुरू श्रीनिवास वरखेडी व प्र-कुलगुरू डॉ. श्रीराम कावळे यांचीही प्रमुख उपस्थिती होती.

आचार्य पदवी प्राप्त व सुवर्ण पदक प्राप्त विद्यार्थी विश्‍वकल्याणाकरिता आपले जीवन समर्पित करतील, या विश्‍वासासह आपण या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देत आहोत. विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक किंवा हिऱ्याप्रमाणे आपले जीवन कसे चमकेल व समाजाला कसा प्रकाश देता येईल, याचे चिंतन करणे गरजेचे आहे, असेही कुलपती कोश्‍यारी म्हणाले.

कुलगुरू प्रा. श्रीनिवास वरखेडी म्हणाले की, आदिवासी व वन विद्यापीठ म्हणून गोंडवाना विद्यापीठाला विशेष दर्जा मिळायला हवा. पदव्युत्तर शिक्षण विभागासाठी परीक्षा व प्रशासकीय विभागासाठी इमारत बांधण्याकरिता निधी मंजूर करावा, स्थानिक आदिवासी कलाकार व लोकनाट्य यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी विशेष सांस्कृतिक सभागृह मंजूर करावे, स्वतंत्र सहसंचालक कार्यालय मंजूर करावे, तसेच मॉडेल कॉलेज बांधण्यासाठी विशेष निधी मंजूर करावा आदी मागण्या त्यांनी उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत या उद्देशून केल्या.

राष्ट्रीय मूल्यांकन आणि मान्यता परिषद बंगलोरचे डॉ. एस. सी. शर्मा म्हणाले की, भारतातल्या विविध आदिवासी जमातींमध्ये गोंड सगळ्यात मोठे आदिवासी आहेत. ते भारताच्या मध्य पर्वतीय भागामध्ये राहतात. ते दृढनिश्‍चयी आणि मेहनती आहेत, असेही ते म्हणाले.

दीक्षांत समारंभात २२ विद्यार्थ्यांना २८ सुवर्ण पदके व ६९ विद्यार्थ्यांना आचार्य पदवी प्रदान करण्यात आली. संचालन डॉ. शिल्पा आठवले, डॉ. नरेंद्र आरेकर यांनी केले. आभार विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. अनिल चिताडे यांनी मानले. या ऑनलाइन कार्यक्रमाचे थेट प्रक्षेपण करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024, CSK vs PBKS Live Score: पंजाबचा कर्णधार सॅम करनने जिंकला टॉस, चेन्नई संघात दोन मोठे बदल; पाहा प्लेइंग-11

PM Modi Exclusive: क्लिनचिट मी दिलेली नाही.. भ्रष्टाचाराच्या लढ्यावर मोदी अजूनही ठाम, विरोधकांच्या प्रश्नाला थेट उत्तर

आणिबाणी नंतरच्या निवडणुकी नंतर वाळवा तालुक्याला लागली होती लॉटरी; नेमके काय घडले ?

Zapatlela 3 : 'झपाटलेला ३' मध्ये पुन्हा लक्ष्याच ? ; हॉलिवूडनंतर पहिल्यांदाच मराठीत प्रयोग

PM Modi Exclusive: ठाकरे गटाकडून होणाऱ्या वैयक्तिक टीकेवर पंतप्रधान मोदी स्पष्टच बोलले, 'माझ्या कौटुंबिक स्थितीचीही थट्टा, पण..'

SCROLL FOR NEXT