Gowars are still used for cooking in rural areas Gadchiroli news 
विदर्भ

ग्रामीण भागात चुलीसाठी आजही गोवाऱ्यांचाच वापर; नव्या युगात नवे तंत्रज्ञान आले, तरी जुन्याचे महत्त्व कायम

मंगेश जाधव

सिरोंचा (जि. गडचिरोली) : भारत हा कृषिप्रधान देश आहे. त्यामुळे शहरी भागांत गॅसवर स्वयंपाक होत असला, तरी ग्रामीण भागांत आजही शेणाच्या गोवऱ्यांचाच वापर होताना दिसत आहे. आता तर इंधन दरवाढीचा बोजा नागरिकांवर आल्याने ग्रामीण भागांतील महिलांचा ओढा पुन्हा एकदा चुलीकडे वाढला आहे. ही चूल पेटविण्यासाठी मोठ्या प्रमाणात गोवऱ्यांचा अनेकजण वापर करत असल्याचे दिसून येते आहे.

भारताची संस्कृती ग्रामीण भागाने ओळखली जाते. शहरात जरी तंत्रज्ञानाचा झगमगाट असला तरी ग्रामीण भागात मात्र याला फार स्थान नाही. घरोघरी मातीच्या चुली ही म्हण सर्वांनी ऐकली आहे. ही जुनी म्हण असली तरी आजही ग्रामीण भागात स्वयंपाकासाठीच्या चुली नाहीशा झाल्या नाहीत. फरक एवढाच की चुलीचा वापर काही प्रमाणात कमी झाला आहे. मात्र, आजही ग्रामीण भागात बहुतांश गावात चुलीचा वापर केला जात आहे.

धावपळीच्या जीवनामध्ये गॅस शेगडीसारख्या उपकरणांचा वापरही मोठ्या प्रमाणात होऊ लागला आहे. शहरात ही उपकरणे सगळेच नागरिक वापरताना दिसत आहेत. हळुहळू ही पद्धत ग्रामीण भागात आली आहे. आज बऱ्याच लोकांकडे गॅस सिलिंडरचा वापर होतो. मात्र, त्यामुळे चुलीचे महत्त्व कमी झाले नाही. ग्रामीण भागात आजही शेतकरी मोठ्या प्रमाणात असून गाय, म्हैस, शेळ्या आदी पशुधनाद्वारे आपला उदरनिर्वाह करत असल्याचे दिसत आहे.

आजही चुलीचा उपयोग स्वयंपाक तयार करण्यासाठी केला जात आहे. पाणी गरम करण्यासाठी चुलीसह शेगडीचाही वापर होत आहे. या चुली किंवा पारंपरिक शेगडीसाठी इंधन म्हणून पूर्वीपासून लाकडाचा भुसा, कोळशाची चुरी व शेणाच्या गोवऱ्यांचा वापर केला जात आहे. ग्रामीण भागात नागरिक शेणापासून गोवऱ्या तयार करीत असतात.

गाई, म्हशी शेतात किंवा रानावनात चरायला जातात त्याच ठिकाणी त्यांचे शेण पडलेले असते. ते गोळा करण्याची पद्धत ग्रामीण भागात बहुतांश ठिकाणी आजही कायम आहे. हे शेण एकत्र करून त्यापासून गोवऱ्या तयार करीत असतात. त्याचा वापर इंधन म्हणून चुलीसाठी केला जात आहेत. विज्ञान युगात बऱ्याच परंपरा बदलल्या असल्या तरी ग्रामीण भागात मात्र काही गोष्टी आजही कायम आहेत.

पशूंचे वाचतील प्राण

मागील काही वर्षांत दूध न देणाऱ्या भाकड तसेच म्हाताऱ्या, आजारी जनावरांची विक्री पशुपालक कत्तलखान्याच्या हस्तकांना करतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पशुधन कमी होत आहे. पण, जनावरांच्या शेणापासून गोवऱ्या व इतर चांगली उत्पादने तयार केल्यास व त्याला चांगली बाजारपेठ उपलब्ध करून दिल्यास शेतकऱ्यांच्या दृष्टीने निरुपयोगी झालेल्या या जनावरांचे प्राण वाचू शकतील.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nepal Protest Updates: नेपाळमध्ये हिंसाचाराचा भडका ! भारताने विमान, रेल्वे सेवा केली स्थगित, नागरिकांना महत्त्वाचे आवाहन

Ballari Jail : 'या' अभिनेत्याने रडत रडत न्यायाधीशांकडे कारागृहात केली विष देण्याची विनंती; असं काय घडलं त्याच्यासोबत?

Latest Marathi News Updates : आज मराठवाड्यातील काही भागांत विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता

Chhagan Bhujbal : ‘कुणबी’चा आदेश मागे घ्यावा; ओबीसींच्या हक्कांवर गदा आणू नका

मोहोळ तालुका हादरला! गलंदवाडी येथील दांपत्यास कोयत्याने मारहाण करून दरोडा; दोघेजण जखमी, जीवे मारण्याची धमकी अन्..

SCROLL FOR NEXT