File photo 
विदर्भ

ग्रामस्वच्छतेचा वेलू गेला गगनावरी!

नितीन नायगावकर

ग्रामस्वच्छतेचा वेलू गेला गगनावरी!
नागपूर : स्वतःचा परिसर स्वच्छ करण्यासाठी एकाने पाऊल उचलले आणि बघता बघता त्याच्याशी शंभर तरुणांची फौज जुळली. एक वस्ती, एक गाव ते शंभर गावांपर्यंतचा ध्यास घेत मोहीम उभी झाली. निःस्वार्थ सेवेसाठी आठवड्याचा एक दिवस देणाऱ्या या तरुणांनी ग्रामस्वच्छतेचा वेलू गगनापर्यंत नेला. ही कहाणी सरकारी अनुदानातून "गलेलठ्ठ' झालेल्या कुण्या संस्थेची नसून हुडकेश्‍वर (खुर्द) या गावातील तरुणांची आहे.
आपलं गाव मागास वाटणं आणि त्याचं मागासलेपण दूर करण्याची इच्छा बाळगणं, यात खूप अंतर आहे. हे अंतर कमी करण्याचे काम सचिन घोडे यांनी केले. 2014 ला अशाच एका ध्यासाने त्यांना झपाटले आणि हाती झाडू घेऊन परिसर स्वच्छ करण्यासाठी निघाले. प्रेरणा होती महात्मा गांधी, गाडगेबाबा आणि तुकडोजी महाराजांची. सुरुवातीला चार तरुण सोबत आले. भजन-कीर्तन, गाडगेबाबा-तुकडोजींच्या रचना गाऊन गावकऱ्यांचे प्रबोधन होऊ लागले आणि नंतर एकामागोमाग लोक जुळत गेले. निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन या नावाने संस्थेने बाळसे धरले. बघता बघता 120 तरुणांचा समूह झाला. धामणा, अड्याळी, निंबा, कन्हाळगाव, खरसोली, कळमना, टाकळी, उंबरगावपावनगाव, नरसाळा, आवंडी गाव, आसोली अशा सत्तरहून अधिक गावांमध्ये आतापर्यंत मोहीम राबविण्यात आली. स्वतःच्या खिशातून पैसे टाकून गावात कचराकुंड्या देणे, झाडू खरेदी करणे आदी कामं होऊ लागली. हा पैसाही कमी पडायला लागला तेव्हा गावातील घराघरांमध्ये जाऊन या तरुणांनी तेलाचे पिंप गोळा केले आणि त्यावर "कचरापेटी' अशी अक्षरे गोंदवून गावांमधील लाकडी खांबांवर लावले. शंभर गावांमध्ये स्वच्छता अभियान राबवून ही मोहीम अधिक व्यापक करण्याचा विडा या संस्थेने उचलला आहे. मुख्य म्हणजे मोहिमेत सहभागी होणाऱ्या प्रत्येक तरुणाला तुकडोजी महाराजांच्या गीतेवर हात ठेवून निःस्वार्थ सेवेची शपथ दिली जाते. विशी-तिशीतील हे स्वच्छतादूत पुरस्काराची रक्कमही अभियानासाठीच खर्च करतात, हे विशेष.

आमच्या अभियानाला लवकरच पाच वर्षे पूर्ण होतील. पुढे कचऱ्यातून खत तयार करण्याचा प्रकल्प आम्ही हाती घेणार आहोत. 120 तरुणांची आमची टीम स्वतःच्या खिशातून पैसा टाकून हे सारे काम करीत आहे.
- सचिन घोडे,
निःस्वार्थ अखंड सेवा फाउंडेशन

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Dhananjay Mahadik Criticises Rahul Gandhi : धनंजय महाडिकांचा राहुल गांधींवर हल्लाबोल; म्हणाले, 'निवडणूक आयोगाबद्दल चुकीची माहिती पसरवून दिशाभूल सुरू'

ICC Cricket World Cup 2027: वर्ल्ड कप 2027 चं शेड्यूल कधी जाहीर होणार? अनाउन्समेंटची तारीख समोर; जाणून घ्या कुठे होणार घोषणा

बॉलिवूडला दणका! चित्रपट निर्माते 'प्राप्तिकर'च्या रडारवर, अनेक दिग्गज सेलिब्रिटींवरही कारवाई

Marathi News Live Updates: मातंग समाजाचा मुंबईत मोर्चा; सीएसएमटी ते मंत्रालय मार्गावर रस्ता अडवण्याचा प्रयत्न, पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड

Jan Shatabdi: जनशताब्दी एक्स्प्रेसमध्ये तांत्रिक बिघाड, 3 तासांपासून एकाच ठिकाणी ठप्प; प्रवाशांचा खोळंबा

SCROLL FOR NEXT