crime ( 
विदर्भ

नातेच उठले जीवावर, शेतीच्या वादातून नातवानेच केली आजीची हत्या

सकाळ वृत्तसेवा

चंद्रपूर : पैसे, इस्टेटीपेक्षा रक्‍ताचे नाते पातळ असते, याची उदाहरणे आपण अनेकदा समाजात बघतो. पैशासाठी अनेक जवळची नाती कोर्टाची पायरी चढतात. आणि अनेकदा एकमेकांच्या जीवावरही उठतात. अशीच घटना नुकतीच चंद्रपूर जिल्ह्यात घडली. आजीच्या नावावर असलेली शेती आपल्या नावावर करून द्यावी, या कारणावरून नातवाचा आजीशी वाद होता. 24 जूनला याच कारणाने आजी-नातवात वाद झाला. रागाच्या भरात नातवाने लाकडी दांड्याने आजीवर हल्ला चढविला. यात आजीचा मृत्यू झाला. ही घटना तालुक्‍यातील परसोडा येथे घडली. लहानाबाई हरिदास उईके (वय 75) असे मृत आजीचे, तर प्रशांत लक्ष्मण उईके (वय 35) असे नातवाचे नाव आहे.

परसोडा येथे लहानाबाई उईके राहत होत्या. त्यांच्या नावावर 15 एकर शेतजमीन आहे. त्यातील तीन एकर जमीन काही दिवसांपूर्वी विकण्यात आली. उर्वरित जमीन आपल्या नावावर करून देण्याच्या मागणीसाठी नातू प्रशांत उईके हा आजीकडे तगादा लावत होता. एवढेच नाही, तर याच कारणाने त्याने आजीला मारहाण सुद्धा केली आहे.

24 जूनला नातू प्रशांत याने याच कारणावरून आजी लहानाबाई उईके हिच्याशी वाद घातला. रागाच्या भरात प्रशांतने आजीवर लाकडी दांड्याने हल्ला चढविला. या हल्ल्यात आजी गंभीररीत्या जखमी झाली. परंतु, तिला उपचारार्थ दाखल केले नाही. त्यामुळे आजीचा मृत्यू झाला.
या घटनेची तक्रार गावचे पोलिस पाटील यांनी वरोरा पोलिस ठाण्यात केली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला.

सविस्तर वाचा - शाळा सुरू पण घंटा वाजणार नाही

मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविला. नातू प्रशांत उईके याला अटक करून त्याच्याविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला. पुढील तपास पोलिस उपविभागीय अधिकारी डॉ. नीलेश पांडे यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक उमेश पाटील करीत आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Point Table: दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाचा Mumbai Indians ला फटका; सर्व सघांची झाली एक लढत, मोठी उलथापालथ

Supreme Court : अनावश्यक खटले टाळा! अधिकाऱ्याच्या बडतर्फीला आव्हान देणाऱ्या केंद्र सरकारला सुप्रीम कोर्टानं फटकारलं, ठोठावला दंड

Pune BJP News: पुणे महापालिका स्वीकृत नगरसेवकांना थेट पाच वर्षांची मुदत; अडीच वर्षांच्या आशेवर पाणी, अनेक कार्यकर्त्यांचा पत्ता कट

Countries with most uranium: अणुऊर्जेसाठी लागणारं युरेनियम कोणत्या देशाकडे सर्वाधिक आहे? भारत, पाकिस्तान कितव्या क्रमांकावर?

Kidney Transplant : मूत्रपिंड प्रत्यारोपणासाठी १९७० रुग्ण प्रतीक्षेत; पुणे विभागातील १४०० पुरुषांसह ५७० महिलांचाही समावेश

SCROLL FOR NEXT