File photo
File photo 
विदर्भ

'ग्रीन हाउस गॅस'वर नियंत्रणासाठी संत्रानगरीत पायलट प्रोजेक्‍ट

सकाळवृत्तसेवा

नागपूर : ग्रीन हाउस गॅसमुळे वातावरणात वाढ होत असून त्यावर नियंत्रणासाठी फ्रान्स व युरोपियन युनियनच्या सहकार्याने नागपुरात पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात केंद्र सरकारने फ्रान्ससोबत करार केला. विशेष म्हणजे देशात तीन शहरात पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यात येणार असून यात नागपूरचा समावेश आहे.
वाहनांच्या धुराद्वारे बाहेर पडणाऱ्या कार्बन डाय ऑक्‍साईड, नायट्रस ऑक्‍साईड, मिथेन या ग्रीन हाउस गॅसमुळे शहराच्या तापमानामध्ये सातत्याने वाढ होत आहे. याशिवाय सिमेंट रोड, एसी, फ्रीज, संगणकही तापमान वाढीत भर घालत आहे. त्यामुळे भविष्यात असह्य तापमान वाढण्याची शक्‍यता आहे. भविष्यातील हे संकट टाळण्यासाठी "मोबीलाईज युवर सिटी' कार्यक्रमाअंतर्गत ग्रीन हाउस गॅसवर नियंत्रणासाठी केंद्रीय गृहनिर्माण व शहर विकासमंत्री हरदीपसिंग पुरी व फ्रान्सचे राजदूत अलेक्‍झांडर झेग्लर यांच्या उपस्थितीत मंत्रालयाचे ओएसडी मुकुंदकुमार सिन्हा व एएफडीचे विभागीय संचालक निकोलस फॉर्नेज यांनी करारावर स्वाक्षरी केल्या. नागपूरसह, कोची व अहमदाबाद या शहरात पायलट प्रोजेक्‍ट राबविण्यात येणार आहे. सुसह्य वाहतूक धोरण राबविण्यासाठी युरोपियन युनियन साडेतीन मिलियन युरो देणार आहेत. या पायलट प्रोजेक्‍टसाठी फ्रान्सची एएफडी तांत्रिक सहकार्य करणार आहे. शहरात पायलट प्रोजेक्‍ट स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबेल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड या एसपीव्ही कंपनीतर्फे राबविण्यात येणार आहे. नुकताच एएफडी व युरोपियन युनियनच्या पथकाने नागपूरला भेट दिली होती. "मोबीलाईज युवर सिटी' यावर दोनदिवसीय कार्यशाळेत त्यांनी भाग घेतला होता. या कार्यशाळेत ग्रीन हाउस गॅस कमी करण्यासाठी उपाययोजना तसेच प्रदूषण होणार नाही, अशा वाहनांवर भर देण्यासंदर्भात चर्चा झाली होती. वाहनांचा कमी वापर व्हावा, यासाठी शहरातील नागरिकांना आकर्षक फूटपाथ तयार करून देण्याबाबत चर्चा झाली होती.
नुकताच एएफडी व युरोपियन युनियनचे पथक नागपुरात आले होते. शहरातील ग्रीन हाउस गॅसवर नियंत्रणासाठी स्मार्ट सिटी एसपीव्हीने 11 जुलैला एएफडीसोबत सामंजस्य करार केला होता. त्यानंतर मागील आठवड्यात मोबीलाईज युवर सिटीअंतर्गत कार्यशाळाही आयोजित करण्यात आली होती. ग्रीन हाउस गॅसवर नियंत्रणासाठी पायलट प्रोजेक्‍ट स्मार्ट सिटी एसपीव्ही करणार आहे.
डॉ. रामनाथ सोनवणे, सीईओ, स्मार्ट ऍण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vijay Wadettiwar : हेमंत करकरे प्रकरणात वडेट्टीवारांनी दिला 'या' पुस्तकाचा दाखला; उज्ज्वल निकम यांच्यावरही गंभीर आरोप

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

IPL 2024 LSG vs KKR Live Score: लखनौला बसला दुसरा धक्का, कर्णधार केएल राहुलला हर्षित राणाने धाडलं माघारी

Vijay Wadettiwar : ''हेमंत करकरेंची हत्या पोलिसांकडून'', विजय वडेट्टीवारांचा आरोप अन् फडणवीसांचा पलटवार

IPL 2024: हर्षल तुला निवृत्तीच्या दिवसात CSKचं काँट्रॅक्ट मिळणार नाही! धोनीला शुन्यावर बाद करणारा गोलंदाज होतोय ट्रोल

SCROLL FOR NEXT