विदर्भ

जांभूळ उत्पादक आर्थिकदृष्ट्या सक्षम बनणार; नागपुरात विक्री

सकाळ वृत्तसेवा

गडचिरोली : जिल्ह्याच्या कोरची तालुक्यातील जांभळाला (jambhul fruit sale) नागपूरसारखी मोठी बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी नागपूरमध्ये गडचिरोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे (State Public Works Minister Eknath Shinde) यांच्या ऑनलाइन उपस्थितीत जांभूळविक्रीला प्रारंभ करण्यात आला. गडचिरोलीतील कोरचीसारख्या अतिदुर्गम भागात सुमारे ७६ टक्के लोक शेती व्यवसाय करतात (jambul fruit sales business). या आदिवासी शेतकऱ्यांना जांभूळविक्रीतून चांगले उत्पन्न मिळेल व आर्थिक स्थिती सुधारेल, असा विश्वास पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. (Green-lantern-for-sale-of-jambhul-in-Nagpur)

पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या संकल्पनेतून कोरचीतील जांभूळविक्री नागपूरसारख्या महानगरात करण्याचा विचार पुढे आला आणि कोरोचीतील जांभळास प्रसिद्धी मिळू लागली. आतापर्यंत व्यापारी १० ते १५ रुपये किलो दराने जांभळाची खरेदी उत्पादक शेतकऱ्यांकडून करत होते. मात्र, आता महिला बचतगटांच्या माध्यमातून याच जांभळाची खरेदी २५ रुपये किलो दराने केली जाणार आहे. त्यामुळे उत्पादकांना त्याचा लाभ मिळेल. या सर्वांत महिला बचतगटांनी दाखवलेला पुढाकार प्रशंसनीय ठरला आहे.

कोरची तालुक्यातील जांभळांची विक्री सध्या चंद्रपूर, नागपूर, वडसा, ब्रह्मपुरी, छत्तीसगड राज्यातील रायपूर, राजनांदगाव, भिलाई, दुर्ग येथील व्यापारी करीत होते. त्यात व्यापाऱ्यांचा पुरेपूर आर्थिक लाभ होत होता. परंतु, स्वतः कष्ट करून जांभळाचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्याला मात्र पुरेसा मोबदला मिळत नव्हता. त्यामुळे अशा उत्पादकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम बनवण्याचा पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी निर्धार केला व तो निर्धार पूर्णत्वास नेला.

गुणकारी जांभूळ

मधुमेह, दमा, हृदयरोग, पोटाचे आजार, कर्करोग यासारख्या विविध आजारांवर जांभूळ गुणकारी आहे. जांभळामध्ये ग्लुकोज व फ्रुक्टोज, कॅल्शिअम, लोह, मॅग्नेशिअम, फॉस्फरस, सोडिअम, व्हिटॅमीन सी, थायमीन, रायबोफ्लेवीन, नियासीन, व्हिटॅमीन बी ६, फॉलिक ॲसिड, प्रोटिन व कॅरोटीनसारखे घटक असल्याने त्याचा बहुविध कारणांसाठी वापर केला जातो.

व्यवसायाला गती मिळेल

जंगलातील जांभळं गोळा करण्यापासून ते जांभळाचे मूल्यवर्धन करून बाजारात विकेपर्यंतच्या प्रक्रियेत समावेश असणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याने एकत्र येऊन मोठ्या बाजारपेठांमध्ये जांभूळविक्री महोत्सवाचे आयोजन केल्यास या व्यवसायाला गती मिळेल, असा विश्वासही पालकमंत्री शिंदे यांनी व्यक्त केला.

(Green-lantern-for-sale-of-jambhul-in-Nagpur)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Jalgaon Major Accident: भरधाव कारच्या धडकेत मजुरी करण्याऱ्या आईसह दोन चिमुकले ठार!

IPL 2024 DC vs RR : दिल्लीचा राजस्थानला दणका, घरच्या मैदानात मिळवला दणदणीत विजय; संजू सॅमसनचे अर्धशतक व्यर्थ

Virtual Touch: बालकांना 'व्हर्च्युअल स्पर्शा'च्या धोक्याची जाणीवही करुन देणं गरजेच - हायकोर्ट

Navneet Rana: "काँग्रेसला मत देणं म्हणजे थेट पाकिस्तानला मत देणं"; नवनीत राणांचं वादग्रस्त विधान

यवतमाळ जिल्हा कारागृहातील धक्कादायक घटना; कारागृहातील अधिकारी, कर्मचाऱ्यावर कैद्यांच्या टोळीचा हल्ला

SCROLL FOR NEXT