green lynx spider sakal
विदर्भ

Daryapur News : सांगळूदकर महाविद्यालयात ग्रीन लिंक्स स्पायडर प्रजातीचा शोध

राजस्थानमधील ताल छापर या भागातील ग्रीन लिंक्स स्पायडर पिऊसेटिया छापराजनिर्विन या नवीन प्रजातीचे संशोधन.

सकाळ वृत्तसेवा

दर्यापूर - राजस्थानमधील ताल छापर या भागातील ग्रीन लिंक्स स्पायडर पिऊसेटिया छापराजनिर्विन या नवीन प्रजातीचे संशोधन जे. डी. पाटील सांगळूदकर महाविद्यालय, दर्यापूर येथील स्पायडर रिसर्च लेबोरेटरीमध्ये संशोधक प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांनी केले आहे.

सदर प्रजाती ही राजस्थानमधील चुरू जिल्ह्यातील ताल छापर वाइल्डलाइफ अभयारण्यामधून निर्मला कुमारी यांनी प्राप्त केली होती. या प्रजातीची ओळख पटविण्याचे काम स्पायडर रिसर्च लेबोरेटरी, दर्यापूर येथे करण्यात आले. ही प्रजाती बाभूळ झाडांच्या हिरव्या पानांवर आढळते. तिचे मागील पाय लांब असतात, त्यामुळे तिची फिरण्याची गती जास्त असते. डॉ अतुल बोडखे यांच्या सांगण्यानुसार ही प्रजाती विज्ञानासाठी नवीन आहे.

हा स्पायडर घातक छोट्या किटकांना आपले भक्ष बनवतो. त्याचबरोबर मोथ सारख्या मोठ्या किटकांना सुद्धा फस्त करतो व जंगलाचे संवर्धन करतो. तसेच हा निशाचर कोळी असून रात्रीला किटकांचा जंगलामध्ये संहार करतो. हा कोळी जंगलामधील हिरव्या झुडुपांमध्ये लपून बसतो व तेथील येणाऱ्या सर्व किटकांना आपले भक्ष बनवतो आणि सूक्ष्म वातावरणाचे संवर्धन करतो.

स्पायडर संशोधक निर्मला कुमारी या स्पायडर संशोधक असून त्या विनोद कुमारी यांच्या मार्गदर्शनात राजस्थान विद्यापीठ जयपूर येथे स्पायडरवर संशोधन करीत आहेत. फिल्ड सर्वे करीत असताना निर्मला कुमारी यांना ही प्रजाती ताल छापर अभयारण्यात आढळून आली आहे.

हे संशोधन आफ्रिकेमधील प्रचलित असलेल्या सर्केट या शोधपत्रिकेमध्ये प्रसिद्ध झालेला आहे. या संशोधनाबद्दल श्री शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख तसेच संपूर्ण व्यवस्थापन परिषदेचे सदस्य यांनी प्राचार्य डॉ. अतुल बोडखे यांचे अभिनंदन केले आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून दर्यापूर येथील सांगळूदकर महाविद्यालयाच्या प्रयोग शाळेत रिसर्च सुरू आहे. कोळी प्रजातीमधील बऱ्याच नव्या जातींचा शोध आतापर्यंत लागला आहे. राजस्थानमधून आलेल्या या नव्या कोळी प्रजातीचा शोध घेण्यात आमचा सहभाग असून ते कार्य यशस्वी झाले आहे. याचा आनंद व अभिमान वाटतो.

- डॉ. अतुल बोडखे, स्पायडर संशोधक, दर्यापूर.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

पुन्हा Ee Sala Cup Namde! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फायनलमध्ये दिमाखात प्रवेश; गुजरात टायटन्सचा लाजीरवाणा पराभव

BJP Government: भाजप सरकार देणार पाच रुपयांमध्ये मासे-भात भोजन; महिलांसाठी अन्नपूर्णा योजनेची घोषणा

Sholay Style Agitation : पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाइलने आंदोलन; जलजीवन योजनेचे पाणी घरापर्यंत पोहोचत नसल्याने केला निषेध

Ambad Rajasthani Women: अंबडमध्ये राजस्थानी महिला मंडळाचा ‘धोंडा रो आगमन’ सोहळा; दीडशे लेकींचा पारंपरिक धोंडे जेवण, आहेर व भेटवस्तूंनी सन्मान

Sakoli Murder Case: गडकुंभली तलाव हत्याकांड उघड: निखिल कांबळे खूनप्रकरणी आरोपी जेरबंद, तलावातून धारदार चाकू व दगड जप्त

SCROLL FOR NEXT