muslim in akola.jpg 
विदर्भ

Video : या माणुसकीला सलाम...! कोरोनाबाधित हिंदू व्यक्तीवर मुस्लिम बांधवांकडून अंत्यसंस्कार

सुगत खाडे

अकोला : जगभर धुमाकूळ घालणाऱ्या कोरोना विषाणूने रक्ताच्या नात्यात सुद्धा दुरावा निर्माण केला आहे. कोरोना महामारीच्या या काळात पित्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यास नकार देण्याची दुर्दैवी घटना अकोल्यात घडली. परंतु या संकटाच्या काळात मुस्लिम युवकांनी रमजान ईदच्या पूर्वसंध्येला माणुसकीचा परिचय देत महापालिकेच्या सूचनेवरुन वृद्धाच्या पार्थिवाला मुखाग्नी दिली. त्यामुळे अकोल्यात ‘हिंदू-मुस्लिम भाई-भाई’चा नवा अध्याय रचला गेला.

अकोल्यातील श्रावगी प्लॉट परिसरातील रहिवाशी एका हिंदू वृद्ध व्यक्तीचा शनिवारी (ता. 23) त्यांच्या राहत्या घरी अचानक मृत्यू झाला. त्यांची वृद्ध पत्नी कोरोनाबाधित असल्यामुळे तिच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. या वृद्ध दाम्पत्याच्या घरी कोणीच नसल्यामुळे वृद्धाच्या मृत्यूची माहिती परिसरातील नागरिकांनी रुग्णालय प्रशासनाला दिली.

रुग्णालय प्रशासनाकडे मृतदेहाची वाहतूक करण्याची व्यवस्था नसल्यामुळे त्यांनी यासंबंधी महापालिका प्रशासनाला माहिती दिली. महापालिकेचे स्वछता अधिकारी प्रशांत राजुरकर यांनी यासंबंधिची माहिती ‘कच्छी-मेमन जमात ट्रस्ट’चे जावेद झकारिया यांना दिली. त्यामुळे शनिवारी (ता. 24) सायंकाळी मृतदेह शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात ठेवण्यात आला. त्यानंतर रविवारपर्यंत रूग्णालय आणि महापालिका प्रशासनानं वृद्ध व्यक्तीचे कुटुंबिय आणि नातेवाईकांसोबत मृतदेह घेऊन जाण्यासंदर्भात संपर्क साधला.

मात्र, मृत्यूच्या चोवीस तासानंतरही त्यांचा मृतदेह स्वीकारायला रक्ताचं कोणतचं नातं समोर आलं नाही. यावेळी मृतदेह ताब्यात घेण्यासाठी आलेल्या मुलाने सुद्धा पित्याच्या अंत्यसंस्कारास नकार दिला. त्यामुळे याविषयीची माहिती मिळताच ‘कच्छी-मेमन जमात ट्रस्ट’च्या मुस्लिम तरूणांनी या मृतदेहावर विधीवत अंत्यसंस्कारांची तयारी दाखवली व शहरातील मोहता मिल स्मशानभूमीत वृद्धावर हिंदू पद्धतीने अंत्यसंस्कार केले.


पोटच्या मुलाने नाकारला मृतदेह
श्रावगी प्लॉट परिसरातील रहिवाशी असलेल्या वृद्ध व्यक्तीच्या मृत्यूची माहिती प्रशासनाने त्यांच्या नागपूर येथील रहिवाशी मुलाला दिली. त्यामुळे रविवारी (ता. 24) वृद्ध व्यक्तीचा मुलगा अकोल्यात दाखल झाला. यावेळी त्यांने पित्याचे शव ताब्यात घेण्याची सर्व कार्यवाही पार पाडली. परंतु त्यानंतर पित्यावर अंत्यसंस्कार करण्यास नकार दिला. त्यामुळे ‘कच्छी-मेमन जमात ट्रस्ट’चे जावेद झकारिया, तनवीर खान, अजीज खान, शेख इरफान, बाबा भाई, जावेद खान शाबास खान, वसीम भाई, समीर भाई यांनी अंत्यसंस्काराची संपूर्ण तयारी केली. अंत्यसंस्काराची विधीही पार पाडली.


पार्थिवाला अग्नी आणि अनंतात विलीन
कब्रस्थानमध्ये मुस्लिम पद्धतीने अंत्यसंस्कार करणाऱ्या मुस्लिम युवकांनी हिंदू व्यक्तीच्या अंत्यसंस्कारासाठी मोक्षधाममध्ये सरणावर लाकडी रचली गेली. अंत्यसंस्काराची विधीही पार पाडली. त्यानंतर शेवटच्या क्षणी रविवारी (ता. 25) दुपारी वृद्धाला मुखाग्नी देवून ईदच्या पूर्वसंध्येला माणूसकीचा नवा अध्याय रचला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

TMC Symbol Row : निवडणूक आयोगाने 'तृणमूल'चे चिन्ह गोठवले ! ममता आणि रितब्रता गटांकडून मागवले नवे चिन्ह अन् नाव

Team India Schedule : अफगाणिस्तानला लोळवलं, आता भारत पुढे कोणाकोणाचा कार्यक्रम करणार? Asian Games ते ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा, जाणून घ्या संपूर्ण वेळापत्रक

Maharashtra eco-friendly Ganesh idols: राजभवन ते वर्षा निवासापर्यंत उरुळी कांचनच्या पर्यावरणपूरक ‘वृक्ष गजानना’चा डंका; मंदार आर्टसच्या गणेशमूर्तींना राज्यभर मानाचे स्थान

Junnar water dispute case: सामाईक विहिरीच्या पाण्याच्या वादातून मारहाण; जुन्नर न्यायालयाकडून दोघांना एक वर्षांची शिक्षा व दंड

Ranjangaon Ganpati Tradition: रांजणगाव परिसरात शेकडो वर्षांची ‘एक गाव, एक गणपती’ परंपरा कायम; महागणपतीच सर्वांची आराध्य देवता

SCROLL FOR NEXT