corona 2.jpg 
विदर्भ

चक्‍क नवरदेवच निघाला कोरोना पॉझिटिव्ह! वऱ्हाड्यांचा शोध सुरू, प्रशासनाची उडाली झोप!

सकाळ वृत्तसेवा

वर्धा : शहरात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून त्याला प्रतिबंध घालण्याकरिता जिल्हा प्रशासनाकडून तत्काळ उपाययोजना म्हणून वर्ध्यात शुक्रवार (ता. 10 ) पासून सोमवार (ता.12 ) पर्यंत लॉकडाउन घोषित करण्यात आला आहे. या काळात केवळ वैद्यकीय सेवा आणि औषधी दुकाने तेवढी सुरू राहणार आहेत.

पिपरी (मेघे) येथील झालेल्या लग्नाने प्रशासनाची झोप उडविली आहे. या लग्नातील नवरदेवच कोरोनाबाधित असल्याचे पुढे आल्याने अख्खे वऱ्हाड पॉझिटिव्ह निघते की काय, असा प्रश्न निर्माण झाला आहे. आज आलेल्या अहवालात नवरदेवाची आई, नवरी आणि या लग्नाला उपस्थित असलेल्यांपैकी इतवारा परिसरातील दोन वऱ्हाडी पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाला धडकी भरली आहे.

या लग्नात आलेल्या वऱ्हाड्यांचा शोध घेत हाती आलेल्यांची कोरोना चाचणी करण्यात आली. यात आज सकाळी प्राप्त झालेल्या अहवालानुसार कोरोनाबाधित नवरदेवाची आई आणि स्वत: नवरी कोरोनाबाधित असल्याचा अहवाल आला आहे. या दोघींच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींचा शोध सुरू असताना दुपारी या लग्नात गेलेल्या दोघांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्यचिकित्सकांनी दिली. हे दोघे इतवारा बाजार परिसरातील रहिवासी असून हा भाग दाटीवाटीचा असल्याने या परिसरात त्यांचा आणखी कोणाशी संपर्क आला याचा शोध घेण्यात येत आहे.

आतापर्यंत 30 जणांचे घेतले नमुने
या लग्न समारंभात उपस्थित असलेल्यांपैकी एकूण 30 जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी चार जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामुळे येत्या दिवसात आणखी किती जणांचा स्वॅब पॉझिटिव्ह येईल हे सांगणे सध्या कठीण आहे. यामुळे वर्धेकरांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

शहरासह लगतच्या ग्रामपंचायत परिसराचाही समावेश
आज जाहीर करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये आसपासच्या ग्रामपंचायतीमध्येही लॉकडाउन राहणार आहे. यात पिपरी (मेघे), साटोडा, नालवाडी, सावंगी (मेघे), उमरी (मेघे), बोरगाव, म्हसाळा, नटाळा आणि qसदी (मेघे) आदी गावांचाही समावेश करण्यात आला आहे. या गावात या संचारबंदीचा प्रभाव राहणार आहे. या काळात या भागात नागरिकांनी घरीच रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

यवतमाळ येथील व्यक्ती कोरोनाबाधित
सेवाग्राम रुग्णालयात उपचाराकरिता आलेला यवतमाळ येथील व्यक्ती कोरोनाबाधित असल्याचे पुढे आले आहे. त्याच्यावर उपचार सुरू आहेत  

संपादन - स्वाती हुद्दार 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Team India Selection : रिषभ पंतला वन डे संघात स्थान नाही, पण मिळाले कर्णधारपद; Asian Games साठीच्या संघातही दोन बदल, भन्नाट टीम्स

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Censor Board: केंद्राकडून सेन्सॉर बोर्डाची फेररचना! १८ सदस्यांची निवड; निशिगंधा वाड, वामन केंद्रे, मनोज जोशींचा समावेश

SCROLL FOR NEXT