विदर्भ

या पालकमंत्र्यांनी बॅंकांना दिली तंबी...म्हणाले, "फास्ट ट्रॅक' मोडवर पीककर्ज द्या

सकाळ वृत्तसेवा

भंडारा : कोरोना संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर देशाची अर्थव्यवस्था डबघाईस आली आहे. अशा वेळी शेतीच्या माध्यमातून या देशाची अर्थव्यवस्था उभी राहू शकते. खरीप हंगामाच्या मुहूर्तावर पीककर्जासाठी नियमांचे पालन करून जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांना फास्ट ट्रॅक मोडवर कर्ज उपलब्ध करून द्या, असे निर्देश पालकमंत्री सुनील केदार यांनी दिले. त्यासाठी महसूल, कृषी व बॅंक सखी असा टास्कफोर्स तयार करावा, असेही त्यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेच्या सभागृहात शुक्रवारी (ता. 13) आयोजित आढावा बैठकीत ते बोलत होते.
यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे, आमदार नरेंद्र भोंडेकर, राजू कारेमोरे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश्‍वरी एस., अप्पर जिल्हाधिकारी घनश्‍याम भुगावकर, निवासी उपजिल्हाधिकारी शिवराज पडोळे व विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

खरिपासाठी जिल्ह्याला पीककर्ज वाटपाचे 426 कोटी 25 लाख रुपये एवढे उद्दिष्ट होते. त्यापैकी 48 हजार 247 सभासदांना 239 कोटी 67 लाख रुपयांचे पीककर्ज वितरित करण्यात आले. यात महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेत कर्जमुक्तीचा लाभ मिळालेल्या शेतकऱ्यांचासुद्धा समावेश आहे. 30 जूनपर्यंत पीककर्ज वितरित करावे, अशा सूचना पालकमंत्र्यांनी दिल्या.

सेंद्रिय खताचा अधिक वापर करा
धान भरडाईबाबत या बैठकीत आढावा घेण्यात आला. धान खरेदीकेंद्र उभारण्यासाठी आलेल्या अर्जांची यादी करून गोदाम उभारण्यासाठी वखार महामंडळाकडे पाठपुरावा करावा, असे त्यांनी सांगितले.
खरीप हंगाम बी-बियाणे, खते वाटपसंदर्भात या बैठकीत आढावा घेण्यात आला. जिल्ह्यात पीकबदल पद्धतीचा प्रयोग राबविण्यात यावा, असे ते म्हणाले. सेंद्रिय खताचा अधिक वापर करण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना प्रोत्साहित करावे, असे श्री. केदार म्हणाले. गावस्तरीय आपत्ती व्यवस्थापन आराखडा अद्ययावत करण्यात यावा, असे त्यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 आधीच ‘फ्री पास’ घोटाळा उघड! माजी क्रिकेटरच निघाला मास्टरमाइंड, तिकीटांचा काळाबाजार प्रकरणी पोलिसांकडून अटक

Latest Marathi News Live Update : उत्तर पुणे जिल्ह्यात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने महसूल विभागातील बड्या अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे

Pune University: पुणे विद्यापीठात आर्थिक गैरव्यवहार? 'फॉरेन्सिक ऑडिट'साठी एका महिन्यात निविदा

Gas Shortage: भारताने शोधला होर्मुजला पर्याय! 'या' मार्गाने होतोय मुबलक तेल पुरवठा

'ऑल दि बेस्ट' नाटकाच्या नवीन टीमचा ३०० वा प्रयोग! कधी आणि कुठे घ्या जाणून

SCROLL FOR NEXT