अतुल जयस्वाल  
विदर्भ

मेहनतीने झाला "सीए' अन्‌ फेडले अंडेविक्रेत्या बापाचे ऋण... 

शशिकांत जामगडे

 श्रीरामपूर (जि. यवतमाळ) : वडील शिवलाल सहावी उत्तीर्ण, आई रामकला सातवी, भाऊ अमोल बारावी उत्तीर्ण असलेल्या या कुटुंबातील अतुल आहे. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी वडील हातगाडीवर अंडाभुर्जी, आमलेट विक्री करतात.

घरात हलाखीची परिस्थिती असताना अतुल जयस्वालला शिक्षणाची जिद्द होती. "कमवा आणि शिका' या मंत्राचा बालपणापासून अवलंब करीत वडिलांच्या व्यवसायाला त्याने मदत केली. 

जीवनाच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात 

जिल्हा परिषदेच्या केंद्रीय प्राथमिक शाळेत चौथीपर्यंतचे शिक्षण घेतले. कोषटवार विद्यालयातून 55 टक्‍के गुण घेत दहावी उत्तीर्ण केली. वाणिज्य शाखेतून 57 टक्के गुण घेत बारावी उत्तीर्ण झाला. प्रा. अजय क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनात वाणिज्य शाखेची पदवी 54 टक्के गुण घेत मिळविली. सीए होण्याचे स्वप्न उराशी बाळगून अतुलने पुसद सोडले. 

येथूनच त्याच्या जीवनाच्या खऱ्या संघर्षाला सुरुवात झाली. गेल्या 2013मध्ये इंटरमीडियटच्या दोन्ही ग्रुपची तयारी सुरू केली. दरम्यान, तीन वर्षे आर्टिकलशीप करीत 2017मध्ये पहिला ग्रुप क्‍लिअर केला. त्यानंतर दुसऱ्या ग्रुपची सुरुवात करून नोव्हेंबर 2019मध्ये सीएची परीक्षा दिली. गुरुवारी (ता. 16) लागलेल्या निकालात तो उत्तीर्ण झाला. 

इच्छाशक्तीच्या बळावर यशस्वी 

दोन वर्षांपासून वडिलांची तब्बेत ठीक राहत नसल्यामुळे अंडेविक्रीचा व्यवसाय बंद करून त्यांना पुण्याला नेले. त्यावेळी त्याने शिक्षण व नोकरी करीत कुटुंबाचा गाडा हाकला. आता "सीए' झाल्यामुळे त्याला विविध कंपनीच्या गलेलठ्ठ पगाराच्या ऑफर येत आहेत. सहसा उच्चभ्रू व उच्चशिक्षित कुटुंबीयांचे पाल्यच "सीए' होण्याचा मार्ग स्वीकारतात. परंतु, शॉर्टकट नोकरीच्या मागे न लागता कठोर परिश्रम व दृढ इच्छाशक्तीच्या बळावर तो यशस्वी झाला. इतरांसाठीही प्रेरणेचा स्रोत बनला. 
 


विद्यार्थ्यांनी न्यूनगंड बाजूला ठेवावा 
चुलतभावाने एमबीए पदवी मिळविली होती. त्याच्यापेक्षा मानाची पदवी मिळवायची, असा दृढनिश्‍चय केला होता. कुटुंबीय व मित्रांचे सहकार्य मिळाले. प्रा. अजय क्षीरसागर यांच्या प्रोत्साहनामुळे मला "सीए'मध्ये यश संपादन करता आले. सर्वसामान्य विद्यार्थ्यांनी मनातील न्यूनगंड बाजूला ठेवला, तर यशापासून कुणीही रोखू शकत नाही. 
- अतुल जयस्वाल, सीए, पुसद.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IAS Officer Scam Arrested : निवृत्तीच्या शेवटच्या दिवशी १६९ कोटींचा घोटाळा केल्याचे समजलं; आयएएस अधिकाऱ्याला CBI कडून अटक; ८ विभागात ५०४ कोटी लाटले?

Latest Marathi News Live Update : नेरूळमध्ये पावसात शॉर्टसर्किटचा धक्का; करंट लागून दोन महाविद्यालयीन विद्यार्थिनी जखमी

Luxury Bus Bike Accident : लक्झरी बसची दुचाकीला धडक; दोन तरुण ठार, बसचालक फरारी, पोलिसांकडून शोध सुरू

लेकाचा मृतदेह आला पण फुफ्फुस, हृदयासह अवयव गायब; फक्त डोकं आणि असंख्य टाक्यांनी शिवलेलं धड

शी... हे काय वागणं! ५२ वर्षांच्या राम कपूरने २५ वर्षीय मुलाला जबरदस्ती केलं किस; 'लॉकअप' २ चा व्हिडिओ व्हायरल

SCROLL FOR NEXT