Havoc of untimely rains in Amravati district huge loss to farmers 
विदर्भ

video : हवामान विभागाचा अंदाज ठरला खरा; अमरावती जिल्ह्यात अवकाळी पावसाचा कहर, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

प्रशिक मकेश्वर

तिवसा (जि. अमरावती) : हवामान खात्याने विदर्भात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त केला होता. त्यानुसार विदर्भात आलेल्या सलग दोन दिवसांच्या अवकाळी पाऊस व गारपीटने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला गहू, कांदा पिकांची पार दाणादाण उडाली आहे. तोंडचा घास पुन्हा निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

१८ मार्चला अमरावती जिल्ह्यातील दर्यापूर, मेळघाट परिसरात तुफान गारपीट झाल्यानंतर शुक्रवारी सायंकाळी रात्रीच्या वेळी पुन्हा एकदा वादळी पाऊस व गारपीट झाली. मुसळधार पावसामुळे सोंगणीला आलेला गहू व सोंगणी करून ठेवलेला हरभरा पार पावसात भिजला. त्यामुळे अमरावती जिल्ह्यातील नऊ तालुक्याला वादळी पावसाचा तडाखा बसला आहे.

या नऊ तालुक्यांत मोठ्या प्रमाणावर अवकाळी पावसाने शेती पिकांचे मोठे नुकसान केले आहे. उन्हाळ्यामध्ये घेतला जाणारा कांदा पिकासह संत्राचे देखील नुकसान झाले आहे. पुढे आणखी काही दिवस विदर्भात पावसाची शक्यता वर्तविण्यात आल्याने शेतकऱ्यांच्या चिंतेत पुन्हा एकदा भर पडली आहे. अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला गहू, कांदा पिकांची पार दाणादाण उडाली आहे. तोंडचा घास पुन्हा निसर्गाने हिरावून नेल्याने बळीराजा पुन्हा संकटात सापडला आहे.

कांद्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपले
तिवसा तालुक्यातील भारसवाडी येथील गजानन जोरे या कांदा उत्पादक शेतकऱ्यांने आपल्या दोन एकर शेतात कांद्याची लागवड केली होती. यात त्यांनी सत्तर हजार रुपयांचा खर्च केला. मात्र, आता काढणीला आलेला कांद्याला अवकाळी पाऊस व गारपिटीने झोडपून टाकले. कांद्याला गाराचा मार लागल्याने सडला आहे. त्यामुळे त्यांना दोन ते अडीच लाखांचे होणारे उत्पन्न बुडाले आहे. त्यांचे आता लागवडीचे सत्तर हजार रुपये सुद्धा निघणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर मोठे नैसर्गिक संकट उभे ठाकले आहे.
- गजानन जोरे,
कांदा उत्पादक शेतकरी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

IND vs AFG: अभिषेक शर्माचं शतक हुकलं, पण 'असा' पराक्रम करणारा पहिलाच भारतीय ठरला! आंद्रे रसेलला टाकलं मागं

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

SCROLL FOR NEXT