corona mask. 
विदर्भ

संकटकाळातील देवदुत, कर्मचा-यांना वाटले कापडी मास्क

सकाळ वृत्तसेवा


संदीप रायपूरे
गोंडपिपरी : कोरोना व्हायरसने देशात सर्वाधिक धुमाकुळ महाराष्ट्रात घातला आहे. ही परिस्थिती आटोक्‍यात आणण्यासाठी संपुर्ण राज्यासह देशात लॉकडाउन करण्यात आले आहे. शासनाच्या विविध यंत्रणा गावोगावी प्रभावीपणे आपले कर्तव्य पार पाडत आहेत. पण मास्कचा असलेला तुटवडा ही त्यांच्यासाठी चिंतेची बाब आहे. यामुळे गणेशपिपरी येथील मनीष वासमवार यांनी कापडाचे मास्क तयार करून ते विविध यंत्रणांना वितरीत करीत सामाजिक दायीत्व जोपासले आहे.
कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात यावी यासाठी गल्लीपासून दिल्लीपर्यत आरोग्य, पोलीस व महसूल प्रशासन धावाधाव करीत आहे. अशावेळी मास्कचा प्रचंड तुटवडा निर्माण झाल्याने त्यांच्याही चिंतेत वाढ झाली आहे. अशा कर्मचा-यांना मास्कची सुविधा उपलब्ध करण्यासाठी मनीष वासमवार हे पुढे सरसावले. ते स्वत पंचायत समीतीचे सदस्य आहेत. सोबत गोंडपिपरीत त्यांची पॅथालाजीही आहे. कर्मचा-यांना व रूग्णांना वारंवार एकच मास्क कामी यावा यासाठी त्यांनी कापडी मास्क तयार केले. साधारण अशा पध्दतीचे पाचशे मास्क त्यांनी नगरपंचायतीतील कर्मचारी,स्वच्छता कर्मचारी,पोलीस प्रशासन,तहसिल प्रशासनातील कर्मचा-यांना सुपुर्द केले. गोंडपिपरीच्या तहसिलदार सीमा गजभिये, ठाणेदार संदीप
धोबे,यांच्यासह विविध विभागातील कर्मचा-यांना हे मास्क वितरीत करण्यात आले. विशिष्ट कॉटन कापडाचे डब्बल लेअरचे मास्क असून दिवसभर मास्क लावल्यानंतर पुन्हा स्वच्छ धुतल्यांनंतर त्याचा वापर करता येतो.

सविस्तर वाचा - पोलिस इन ऍक्‍शन मोड! रस्त्यावर फिरणाऱ्यांना चोप, उठाबशांचीही शिक्षा
प्रशासनातील विविध घटकांना मास्कचे वितरण केल्यांनतर त्यांनी रूग्णांना मास्क पुरविणार असल्याचे सांगितले आहे. कोरोनापासून बचाव करणे ही सामुहिक जबाबदारी आहे. पण याकामासाठी प्रशासनातील विविध कर्मचारी दिवसरात्र एक करीत आहेत. त्यांना किमान दिलासा मिळावा या हेतूने मास्क वितरण करण्याचा उपक्रम राबविल्याचे मनीष वासमवार यांनी सकाळशी बोलतांना सांगितले.  

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Israel-Gaza War: इस्राईलकडून गाझा शहरात लष्करी कारवाईला सुरुवात; नागरिकांना दक्षिणेकडे निघून जाण्याचं आवाहन

Devendra Fadnavis: ''मी शंभर रुपये द्यायला तयार आहे, पण...'' उद्धव ठाकरेंच्या भाषणावरुन फडणवीसांचं आवाहन

Beed Railway: बीडकरांची ४० वर्षांची स्वप्नपूर्ती! उद्यापासून अहिल्यानगर ते बीड 'रेल्वे'सेवेला सुरुवात; काय आहेत वैशिष्ट्ये?

Yermala News : धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या गैरप्रकारांवर कारवाईसह परवाने रद्द करण्याचे पालकमंत्र्यांचे आदेश

‘एसटी’ आरक्षणासाठी बंजारा समाजाचा सोलापुरात मोर्चा! पारंपरिक वेशभूषेत तरुणांसह महिलांची मोठी गर्दी; आरक्षण मिळेपर्यंत न थांबण्याचा बंजारा समाजाचा निर्णय

SCROLL FOR NEXT