suman 
विदर्भ

चारित्र्याच्या संशयावरून तो तिला सतत मारायचा; आणि एकेदिवशी... 

सकाळ वृत्तसेवा

गोंदिया : पाच मुलांची आई असलेल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन एका संशयखोर पतीने तिचा गळा आवळून खून केला. त्या नराधमाचे कृत्य येथेच थांबले नाही, तर त्याने घटनेनंतर पत्नीचा मृतदेह तब्बल तीन तास घरात लपवून ठेवला. 

माणुसकीला लाजवेल अशी घटना जिल्ह्यातील कुडवा येथील इंदिरानगर, कॉलेजटोली येथे गुरुवारी, ता. 5 मार्चच्या सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली. सुमन मनोज सावनकर (वय 28) असे मृत पत्नीचे तर मनोज झनकलाल सावनकर (वय 35) असे खून करणाऱ्या आरोपी पतीचे नाव आहे. 

दुसरे लग्न करण्याची देत होता धमकी

मनोज सावनकर याचे गोविंदपूर येथील सुमनसोबत आठ वर्षांपूर्वी लग्न झाले होते. त्यांना चार मुली व एक मुलगा आहे. सगळेकाही सुरळीत सुरू असतानाच त्यांच्या सुखी संसाराला कुणाची तरी दृष्ट लागली. तीन - चार वर्षांपासून मनोज सावनकर पत्नी सुमनच्या चारित्र्यावर संशय घेऊ लागला. एवढेच नव्हे, तर माहेरहून हुंडा आण म्हणून तिचा शारिरीक व मानसिक छळसुद्धा करू लागला. आपल्या मुलीकडे पाहून माहेरच्यांनी काही पैसेदेखील मनोजला पुरविले. तरी देखील पत्नी सुमनचा तो छळ करीतच होता. चारित्र्यावर संशय घेऊन मारहाण करणे त्याचे नित्याचेच झाले होते. "मला दुसरे लग्न करायचे आहे. तू माहेरी निघून जा. नाही तर, मुलाबाळांसह तुलाही ठार करेन, अशी तो धमकी द्यायचा. 

पती मनोजने सुमनला संपविले...

गुरुवार, 5 मार्च 2020 चा दिवस. पती मनोज सावनकर याच्या डोक्‍यात संशयाचे भूत होतेच. सायंकाळी त्याने चारित्र्याच्या संशयावरून पुन्हा पत्नी सुमनसोबत भांडण केले. या भांडणात त्याने तिला जबर मारहाण केली. भिंतीवर आपटून तिचे डोके फोडले. त्यानंतर गळा आवळून तिचा खून केला. ही घटना सायंकाळी सहा वाजता घडल्यानंतर आरोपी मनोजने सुमनचा मृतदेह तब्बल तीन तास खोलीतच लपवून ठेवला. रात्री 9 नंतर त्याने मृत सुमनला दवाखान्यात नेण्याचा बहाणा केला, तेव्हा ही घटना समोर आली. सुमनच्या माहेरच्यांना रात्री 11 वाजतानंतर ही घटना समजली. त्यांनी तातडीने सुमनचे घर गाठले तेव्हा ती मृतावस्थेत आढळली. या घटनेची नोंद रामनगर पोलिसांनी केली असून, आरोपी मनोजला अटक केली आहे. 
 

 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CM Yogi: महाराष्ट्रातील कारवायांनंतर उत्तर प्रदेश सरकारला आली जाग! भेसळखोरांविरुद्ध उचलली कठोर पावलं...

तीन वेळा अबॉर्शन झालं... स्वाती देवलने सांगितला डोळ्यात पाणी आणणारा प्रसंग; म्हणाली, 'तुषार खूप रडला कारण...

Pakistan President: ''आम्ही हिंदूंना सहन करतो'', पाकिस्तानातील अल्पसंख्याकांबाबत राष्ट्रपती झरदारींचं संतापजनक विधान

IND vs SL: KL राहुलचा स्वीप शॉट अन् चेंडू आदळला थेट श्रीलंकन खेळाडूच्या हेल्मेटवर; सर्वांच्याच काळजाचा चुकला ठोका!

Prithviraj Chavan: ''तुम्ही माझा राजकीय खून केलात?'' पृथ्वीराज चव्हाणांना गोपीनाथ मुंडे काय म्हणाले होते? पडद्यामागे नेमकं काय घडलेलं?

SCROLL FOR NEXT