farmer 2.jpg 
विदर्भ

फाटका खिसा अन् डोक्यावर कर्ज तरीही, तो राबतोय मातीत

अनुप ताले

अकोला : कोरोनाचा सामना करताना शिक्षण, व्यवसाय, उद्योग व इतरही यंत्रणाची चाके सध्या थांबली आहेत. मात्र, सदैव संकटांचा सामना करणारा शेतकरी कधीच थांबला नाही. उलट न थकता, न घाबरता, स्वतःचे जीवन दावणीवर लावत, सर्वाच्या पोटाची आग विझविण्यासाठी, भूक क्षमविण्यासाठी दिवसरात्र कष्ट उपसत आहे. आताही त्याचा खिसा फाटलेलाच, डोक्यावर कर्ज आणि तरी तो मोठ्या हिमतीने खरिपाच्या तयारीला लागला असून, जणू काही प्रत्येकाला आवाहन करीत आहे, तुम्ही घरातच थांबा, आम्ही राबतो मातीत!

कधी दुष्काळ, कधी अतिवृष्टी, कधी पूर, कधी कीडींचा हल्ला, अशा अनेक संकटांनी शेतकरी सदैव घेरलेला असतो. यापेक्षाही मोठी समस्या म्हणजे, त्याच्या कष्टाला कधीच मोल मिळू शकले नाही आणि दिवसरात्र कष्ट उपसूनही त्याच्या झोपडीत अंधारच राहाला. या दृष्ट चक्राने आतापर्यंत हजारो शेतकऱ्यांना आत्महत्येला प्रवृत्त करत, त्यांचा बळी घेतला आहे. परंतु, आता हाच शेतकरी संपूर्ण जग संकटात असताना, तारणहार ठरणार आहे. कोरोना विषाणूचा प्रादूर्भाव देशात झपाट्याने वाढत असून, दिवसेंदिवस संकट उग्र रुप धारण करत आहे. या संकटाचा सामना करण्यासाठी सरकारने 22 मार्चपासून लॉकडाउनचे पाऊल उचलले आणि देशाच्या अर्थचक्राचा कणा समजणाऱ्या विविध यंत्रणांना ब्रेक लागला. शिवाय नागरिकांच्या सुरक्षेसाठी, सर्वांना घरातच थांबण्याचे आवाहन सुद्धा शासनाने, आरोग्य यंत्रणेने केले आहे. परंतु, शेतकरी थांबला तर, कोणाच्याही जीवनाचे गाडे चालू शकणार नाही. त्यामुळे फक्त शेतकरी सध्या दिवसरात्र शेतात राबत असून, सर्वांच्या जीवनाचा आधार बनला आहे. 

घराघरात पोहचवतोय शेतमाल
संचारबंदीमुळे वाहतूक व्यवस्था खोळंबलेली असून, बाजारपेठेतूनही कोरोना प्रादूर्भाव पसरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दैनंदीन लागणारा भाजीपाला, फळे, धान्य कसे मिळवायचे, याचा पेच नागरिकांसमोर निर्माण झाला होता. मात्र हे आव्हाणही शेतकऱ्यांनी पेलले असून, प्रत्येकाला घरोघरी भाजीपाला, शेतमाल पोहविण्याची सेवा तो नित्याने देत आहे. महत्त्वाचे म्हणजे एरव्ही त्याच्या शेतमालाला कवडीमोल भाव देणाऱ्या नागरिकांकडून दुप्पट दाम वसूल करण्याची संधी असताना, एकही पैसा अधिक न आकारता, केवळ बाजारमुल्य घेऊन, तो शेतमाल पोहचवित आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Arabian Sea Low Pressure : अरबी समुद्रात पुन्हा कमी दाबाचा पट्टा! महाराष्ट्रात आणखी किती दिवस पाऊस पडणार?

Female Doctor Case : महिला डॉक्टरचे प्रकरण दुर्देवी, न्याय मिळवून दिल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही; मुख्यमंत्री फडणवीस यांचा निर्धार

CM Devendra Fadnavis : फडणवीस-शिंदे वेगळे लढणार! भाजपच्या मंत्र्यांनीच दिला मोठा इशारा

Thane News: कल्याणमध्ये मंगळवारी पाणीबाणी! ९ तास पाणीपुरवठा बंद

Latest Marathi News Live Update : निफाडच्या पूर्व भागात परतीच्या पावसाचा हाहाकार शेतीचे मोठे नुकसान

SCROLL FOR NEXT