अमरावती ः रुग्णालयात उपचार घेताना संगीता शिंदे.
अमरावती ः रुग्णालयात उपचार घेताना संगीता शिंदे. 
विदर्भ

उपोषणकर्त्या संगीता शिंदेंची प्रकृती खालावली

सकाळ वृत्तसेवा

अमरावती : राज्यातील शिक्षकांच्या जुन्या पेन्शनसाठी आझाद मैदानावर उपोषणासाठी बसलेल्या शिक्षण संघर्ष संघटनेच्या अध्यक्ष संगीता शिंदे यांची प्रकृती खालावली असून त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज टमिर्नस नजीकच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. उपचारादरम्यानदेखील त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवले असून शिक्षकांना न्याय मिळेपर्यंत अन्नाचा कणही घेणार नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
संगीता शिंदे यांच्या आंदोलनावरून शुक्रवारी (ता. 21) विधानसभेत विरोधक आणि सत्ताधाऱ्यांमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. राज्य सरकारसमोरदेखील मोठा पेच या आंदोलनामुळे निर्माण झाला आहे. आजही हजारो शिक्षक आझाद मैदानावरील आंदोलनात बसलेले असून ते सरकारकडे न्यायाची मागणी करीत आहेत. अमरावती विभागातील हजारो शिक्षक सध्या या आंदोलनात सहभागी झालेत.
आझाद मैदानावर सुरू असलेल्या आंदोलनात दररोज हजारो शिक्षक सहभागी होत असून आंदोलन गेल्या 5 दिवसांपासून सुरूच आहे. या आंदोलनात उपोषणासाठी बसलेल्या शिक्षकांची परिस्थिती गंभीर होत चालली आहे. यामध्ये संगीता शिंदे यांनी स्वत: शिक्षकांसाठी उपोषण सुरू केले असून त्यांची तब्येत खालावत चालल्याने सरकारचेदेखील धाबे दणाणले आहे.
श्रीमती शिंदे यांना जे. पी. हॉस्पिटलमध्ये चेकअपसाठी पोलिस घेऊन गेले. त्यानंतर त्या आंदोलनाकडे परतत असताना त्यांना शिक्षणमंत्री शेलार यांनी विधानभवन परिसरात चर्चेसाठी बोलावले होते. त्यावेळी त्यांना अचानक भोवळ आल्याने त्या खाली कोसळल्या. त्यानंतर त्यांना लगेच सीएसटीनजीकच्या सेंट जॉर्ज हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ajit Pawar: 'ती भटकती आत्मा कोण PM मोदींना विचारणार', शरद पवारांवर केलेल्या अप्रत्यक्ष टीकेवर अजित पवारांची प्रतिक्रिया

Mumbai Lok Sabha: उत्तर पश्चिम मुंबई मतदारसंघातून रवींद्र वायकर शिवसेनेचे उमेदवार

T20 WC 24 Team India Squad : ना अय्यर... ना राणा... शाहरुख खानने 'या' खेळाडूला संघात घेण्याची केली मागणी

Healthy Menopause: हेल्दी मोनोपॉझसाठी 'या' नैसर्गिक उपायांचा करा वापर, मिळतील अनेक फायदे

Rishi Kapoor: 'ज्यांच्यावर आपण प्रेम करतो ते आपल्याला सोडून जात नाहीत'; ऋषी कपूर यांच्या आठवणीत लेक अन् पत्नी भावूक

SCROLL FOR NEXT