file photo 
विदर्भ

सिंदपुरीच्या वसतिगृहातील मुलींची प्रकृती बिघडली; विषबाधेचा संशय

सकाळ वृत्तसेवा

पवनी (जि. भंडारा) : सिंदपुरी येथील सामाजिक न्याय विभागाच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहात वास्तव्यास असणाऱ्या 9 मुलींची प्रकृती बुधवारी अचानक बिघडली. त्यांना शौच, उलटीचा त्रास सुरू झाल्याने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती सध्या धोक्‍याबाहेर आहे.
मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृहातील 9 मुलींना अचानक बुधवारी रात्री पोटदुखी, मळमळ उलटी व डोकेदुखीचा त्रास सुरू झाला होता. वसतिगृह अधीक्षकांनी तत्काळ सर्व विद्यार्थिनींना पवनी येथील ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. यात आचल जनबंधू (वय 17), तेजस्विनी घरडे (वय15), शेयल भांबोरे (वय 12), रुचिता जांगळे (वय 13), श्रेया गजभिये (वय 13), रितिका शेंदरे (वय 13), प्रधन्या शेंडे (वय 13), कामना मेश्राम (वय 13), पूजा सावसाकडे (वय 13) यांचा समावेश आहे. या सर्व मुलींवर प्राथमिक उपचार करण्यात आले. आता त्यांची प्रकृती स्थिर आहे. त्यांना अन्नातून किंवा दूषित पाण्यातून विषबाधा झाली असावी, असा अंदाज आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup Final, Playing XI: भारताने श्रीलंकेविरुद्ध जिंकला टॉस! ट्रॉफी वादाच्या पार्श्वभूमीवर मोहसिन नक्वींच्या उपस्थितीबाबत सस्पेन्स

Arni Crime: आर्णीत पूजा करण्याच्या बहाण्याने महिलेला गुंगीचे औषध; अश्लील व्हिडिओ काढून पैशांची मागणी

विदर्भात पुन्हा वाघाची दहशत! गडचिरोलीत शेतकऱ्यावर हल्ला, वनविभागाकडून सतर्कतेचा इशारा....

Marathi News Live Updates : नेपाळ महापुरातील मृतांची संख्या १,३८८ वर पोहोचली

Gangapur VIP Facility: गंगापूरमध्ये ३.७० कोटींच्या व्हीआयपी विश्रामगृहाचे लोकार्पण; शासकीय निवासस्थानांमुळे अधिकारी मुख्यालयी राहणार

SCROLL FOR NEXT