akola news esakal
विदर्भ

Akola News: कुलरचा शॉक लागून मामाच्या घरी गेलेल्या दोन चिमुकलींचा मृत्यू; काळेगाव येथील हृदयद्रावक घटना

या हृदयद्रावक घटनेने बेलुरा, काळेगाव व खैरखेड या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूनंतर दोघींचाही आपापल्या गावी अंत्यविधी करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Sandip Kapde

सिरसोली (ता. तेल्हारा): रविवारी दुपारी दोन वाजता काळेगाव येथे खेळत असताना मामाच्या घरी आलेल्या दोन चिमुकलींचा दुर्दैवी मृत्यू झाला. कुलरचा शॉक लागल्याने या घटनेने काळेगाव सह बेलुरा व खैरखेड या गावांमध्ये शोककळा पसरली आहे.

घटना कशी घडली?

बेलुरा (ता. अकोट) येथील कु. माऊली उर्फ ईशानी प्रवीण ढोले, वय पाच वर्ष, ही काळेगाव येथील रवी रामकृष्ण चिकटे या मामाच्या घरी आली होती. तसेच खैरखेड येथील कु. माऊली उर्फ प्रियांशी सोपान मेतकर, वय पाच वर्ष, ही देखील काळेगाव येथील धीरज चौखंडे या मामाच्या घरी आली होती. दोघींच्याही आई ह्या मैत्रिणी असल्याने त्या दोघी एकत्र खेळत असताना रामकृष्ण चिकटे यांच्या घरातील कुलरचा शॉक लागल्याने जागेवरच मृत्यू झाला.

गावांमध्ये शोककळा-

या हृदयद्रावक घटनेने बेलुरा, काळेगाव व खैरखेड या गावांमध्ये शोककळा पसरली आहे. मृत्यूनंतर दोघींचाही आपापल्या गावी अंत्यविधी करण्यात आला. या दुर्दैवी घटनेमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. (akola news)

या प्रकारामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे आणि या चिमुकल्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. या घटनाक्रमामुळे गावकरी हादरले आहेत व अशा प्रकारच्या अपघातांपासून सावध राहण्याची गरज अधोरेखित झाली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pakistan T20 WC Qualification Scenario : भारताकडून हार अन् पाकिस्तानी बेजार! गुणतालिकेत उलथापालथ, अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर, पाकडे Super 8s मध्ये कसे पोहोचणार?

IND vs PAK T20 WC: हा विजय भारतीयांसाठी! पाकिस्तानच्या मुसक्या आवळल्यानंतर सूर्यकुमार यादवचं 'मन' जिंकणारं विधान...

Harshvardhan Sapkal : 'मुंबईतील रस्त्याला 'टिपु सुलतान'चं नाव देण्याचा भाजपने दिला होता प्रस्ताव', हर्षवर्धन सपकाळांनी थेट पुरावाच सादर केला..

IND vs PAK T20 WC: ८-१ ! कुठेही खेळा, पाकिस्तानचे वस्त्रहरण निश्चित! टीम इंडिया दणदणीत विजयासह Super 8s मध्ये; शेजाऱ्यांचा पुढचा मार्ग खडतर

IND vs PAK T20 WC: आधी झोडले, मग ट्रोल केले! पाकिस्तानची इभ्रत वेशीला टांगल्यानंतर इशान किशन काय म्हणाला वाचा...

SCROLL FOR NEXT