Heat stroke victim in Tivasa taluka of Amravati district
Heat stroke victim in Tivasa taluka of Amravati district 
विदर्भ

सत्तावन वर्षीय वृद्ध शेतात जनावरांना घेऊन गेले; मात्र, उन्ह जास्त असल्याने..

सकाळ वृत्तसेवा

तिवसा (जि. अमरावती) : दोन दिवसांपासून नवतपाला सुरुवात झाली आहे. यामुळे विदर्भातील तापमान चांगलेच वाढले आहे. नागपूरचा पारा 47 अंशाच्या जवळपास पोहोचला आहे. उन्हामुळे लाहीलाही होत असल्यामुळे अनेकांनी घराबाहेर पडणेही बंद केल्याचे दिसत आहे. तसेही लॉकडाउनही सुरू आहे. यामुळे रस्त्यांवर कमी प्रमाणात नागरिक दिसत आहेत. मात्र, अशातच एकाचा उष्माघाताने मृत्यू झाल्याचे पुढे आले आहे. 

कोरोनामुळे नागरिकांना घराबाहेर निघण्यास मनाई करण्यात आली आहे. लॉकडाउन सुरू असल्यामुळे कुणालाही विनाकारण घराबाहेर पडता येत नाही. यामुळे अनेकांचे नुकसान होत आहेत. अत्यावश्‍यक सेवा सोडल्या तर दुसरे कोणतेही दुकान सुरू दिसत नाही. यामुळे नागरिक दुकांमध्ये गर्दी करीत आहेत. मग ते दुपारच्या सुमारासही दुकानांमध्ये गर्दी करीत असल्याचे दिसून येतात. 

मागील दोन दिवसांपासून उन्हाचा पारा 47 डिग्रीच्या वर गेला आहे. अचानक वाढलेल्या उन्हामुळे नागरिकांचे हाल होत आहेत. अधुनमधून येणाऱ्या पावसामुळे नागरिकांना उन्ह जानवत नव्हती. यामुळे यंदा उन्हाळा जानवणार की नाही, असा प्रश्‍न नागरिकांच्या मनात उपस्थित होत होता. मात्र, काही दिवसांपासून उन्हात अचानक वाढ झाली. 

आता मागील दोन दिवसांपासून नवतापाला सुरुवात झाली आहे. यामुळे उन्ह चांगलीच जाणवत आहे. अशात अमरावती जिल्ह्यातील तिवसा तालुक्‍यातील डेहनी शेतीशिवारात एका 57 वर्षीय गुराख्याचा उष्माघाताने मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आली. साहेबराव मोहोड (वय 57, रा. तिवसा, जि. अमरावती) असे मृत व्यक्‍तीचे नाव आहे.

साहेबराव हे नेहमीप्रमाणे जनावरे डेहनी शेतशिवारात चराईसाठी घेऊन गेले होते. मात्र, उन्हाचा पारा जास्त असल्याने त्यांचा मृत्यू झाला. एका झाडाखाली त्यांचा मृतदेह आढळून आला. तिवसा पोलिसांना घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक रिता उईके यांनी घटनास्थळी जाऊन पंचनामा करीत गुन्हा दाखल केला आहे. 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Kalyan Loksabha: प्रशासनाचा भोंगळ कारभार, मतदार यादीत नाव नसल्याने मतदार हैराण

HSC Result 2024 : उद्या लागणार बारावीचा निकाल, गुणपडताळणी कशी करायची ? एका क्लिक मध्ये जाणून घ्या

Google Map Address Update : गुगल मॅपवर पत्ता बदलणे आता तुमच्या हातात ; फॉलो करा 'या' ट्रिक्स

Maharashtra Lok Sabha 2024 Phase 5 Election Voting LIVE: पवईतील हिरानंदानी मतदार केंद्रावर दोन तासांपासून मतदारांच्या रांगा

Kolhapur Lok Sabha : लोकसभा निकालाची उत्सुकता शिगेला; कार्यकर्त्यांत लागल्या पैजा, सट्टाबाजारातही उलाढाल जोरात

SCROLL FOR NEXT