संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र 
विदर्भ

मेडिकलच्या रेडिओलॉजी विभागात भोंगळ कारभार

सकाळ वृत्तसेवा

नागपूर ः शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेडिकल) रेडिओलॉजी विभागात एमआरआय, सीटी स्कॅनसाठी वेटिंग लिस्ट आहे. मात्र, एमआरआय, सीटी स्कॅनंतर रिपोर्ट घेण्यासाठी रुग्णांना खेटा घालाव्या लागत असल्याची माहिती पुढे आली आहे. विशेष असे की, या रुग्णांना येथे उपेक्षितपणाची वागणूक मिळत असल्यामुळे हवालदिल झालेल्या रुग्णांनी वैद्यकीय अधीक्षक कार्यालयाचा रस्ता धरला. एक्‍स-रे विभागातील या भोंगळ कारभारावर नियंत्रण येईल का, असा सवाल पुढे आला आहे.


रेडिओलॉजी विभागातील भोंगळ कारभारासंदर्भात बुधवारी (ता. 20) वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात तीन रुग्णांनी एकाच वेळी तक्रारी केल्या. विशेष असे की, वैद्यकीय शिक्षण व संशोधन विभागाचे संचालक डॉ. तात्याराव लहाने यांनी मेडिकलमध्ये काही दिवसांपूर्वी आकस्मिक भेट दिली होती. रेडिओलॉजी विभागातील सर्व डॉक्‍टरांना धारेवर धरले होते. प्रामुख्याने या विभागातील वेटिंग लिस्ट कमी करण्यासोबतच संख्या वाढविण्यासंदर्भात सूचना केली होती.

आठ ते दहा दिवसांची प्रतीक्षा
मेडिकलमध्ये दर दिवसाला तीन हजार रुग्णांची बाह्यरुग्ण विभागात नोंद होते. गंभीर असे बाराशेवर रुग्ण दाखल होतात. यातील पन्नास टक्‍क्‍यांवर रुग्णांना एमआरआय, सिटी स्कॅन किंवा एक्‍स-रे काढण्याचा सल्ला डॉक्‍टर देतात. या विभागात येताच तारीख दिली जाते. त्या तारखेला एमआरआय काढल्यानंतर अहवालावरून डॉक्‍टर उपचाराची दिशा ठरवतात. परंतु, रुग्णाचे एमआरआय आणि अहवाल येण्यास उशीर लागत असल्याने पुढील उपचाराला वेळ लागतो. रुग्णांना आठ ते दहा दिवसांची उपचाराच्या प्रतीक्षेत राहावे लागते. यामुळे रुग्णांच्या जिवावर बेतू शकते.


एक्‍स-रे विभागातील तक्रारी
1. उमरेड येथील प्रफुल्ल बावणे. (वय 22 वर्षे) एकवीस किलोमीटर धावण्याच्या स्पर्धेसाठी सराव करणारा हा तरुण. याच्या गुडघादुखीवर एमआरआयचा सल्ला मेडिकलच्या डॉक्‍टरांनी दिली. रेडिओलॉजीत दिलेल्या 16 नोव्हेंबरला या तारखेला एमआरआय काढला. चार दिवसांनंतर त्याला बोलावले. 20 नोव्हेंबरला रिपोर्टसाठी आला असता, डॉक्‍टरांनी अहवाल न देता उर्मटपणे त्याला हाकलून लावले. तो तक्रार घेऊन वैद्यकीय अधीक्षक कार्यालयात पोहोचला.

2. मीरा चौधरी या पन्नाशीकडे झुकलेल्या आहे. यांना 5 नोव्हेंबर, त्यानंतर 16 नोव्हेंबरला सीटी स्कॅनसाठी बोलावले. सीटी स्कॅन तपासणीनंतर अहवालासाठी बुधवारी (ता. 20) त्या रेडिओलॉजी विभागात पोहोचल्या. त्यांना अहवाल न देता नंतर या, असा सल्ला दिला. त्यांना चालणे कठीण आहे. त्यांनीही वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले.

3. वेदान्ती गौतम ही 15 वर्षांची मुलगी आहे. सोमवारी क्वार्टर येथे राहते. बुधवारी सीटी स्कॅन तपासणीसाठी आल्यानंतर एक्‍स-रे विभागात गेली. डॉक्‍टरांनी तिला बाहेरचा रस्ता दाखवला. कारण, विचारताच तिला यंत्रात तपासणी करताना क्ष-किरणाने जळण्याचा धोका असल्याचे सांगण्यात आले. तिनेदेखील बुधवारी (ता. 20) वैद्यकीय अधीक्षक कार्यालय गाठले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MI vs KKR : शाहरूख... वानखेडे... केकेआर! अखेर 12 वर्षानंतर संपला विजयाचा दुष्काळ

MSC Aries Ship : इराणने जप्त केलेल्या कार्गो शिपमधील क्रू मेंबर्सची सुटका; 16 भारतीयांचा समावेश

RCB vs GT : गुजरातला प्ले ऑफसाठी विजय गरजेचा, आरसीबी टाकणार का मिठाचा खडा

PM Modi : ''हिंदूंना दुसऱ्या दर्जाचे नागरिक करण्याचा डाव'', पंतप्रधान मोदींची तृणमूल काँग्रेसवर टीका

MI vs KKR IPL 2024 : सूर्यकुमार लढला मात्र केकेआरनं एका तपानंतर वानखेडेवर विजय केला साजरा

SCROLL FOR NEXT