helmate is compulsory for all in brahmpuri of chandrapur 
विदर्भ

नागरिकांनो! वाहन चालवितांना हेल्मेट घालणे सक्तीचे, अन्यथा होणार कारवाई

श्रीकांत पेशट्टीवार

ब्रह्मपुरी (जि. चंद्रपूर) : जिल्ह्यात विनाहेल्मेट दुचाकीस्वारांचे वाढते अपघाताचे प्रमाण लक्षात घेता जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांनी नववर्षाच्या प्रारंभी हेल्मेटसक्तीचा निर्णय घेतला. या निर्णयाला अनुसरून पोलिस विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांना कर्तव्यावर येताना हेल्मेट घालणे अनिवार्य करण्यात आले आहे. दरम्यान, तालुक्‍यातही गुरुवारपासून हेल्मेटसक्ती करण्यात येणार आहे. विनाहेल्मेट दुचाकीस्वारांवर दंडात्मक कारवाई केली जाणार आहे. 

ब्रह्मपुरी पोलिस ठाण्याचे सर्व अधिकारी, कर्मचारी मंगळवारी हेल्मेट घालूनच कर्तव्यावर आले. त्याचबरोबर जनजागृती करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी हेल्मेट घालून दुचाकी रॅली शहरातून काढली. हेल्मेट न घातल्यामुळे आतापर्यंत अनेक दुचाकीस्वारांचे अपघाती मृत्यू झाले. हेल्मेट घातले असते तर त्यांचा जीव वाचला असता. त्यामुळेच जिल्हा पोलिस अधीक्षक अरविंद साळवे यांना जिल्ह्यात हेल्मेट सक्तीचा निर्णय घेतला. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्याच्या सूचना जिल्ह्यातील सर्व पोलिस निरीक्षकांना दिल्या. या निर्णयाची तत्काळ अंमलबजावणी करण्यासाठी पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांनी सर्वांत आधी आपल्या सर्व कर्मचाऱ्यांना हेल्मेटसक्ती केली. हेल्मेट सक्तीची मोहीम तालुक्‍यात अत्यंत प्रभावीपणे राबविली जाणार आहे. विनाहेल्मेट दुचाकी चालविणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्यातील दुचाकी चालकांनी हेल्मेट घालूनच प्रवास करावा अन्यथा दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असे पोलिस निरीक्षक मल्लिकार्जुन इंगळे यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Nitin Gadkari announcement: नितीन गडकरींकडून महाराष्ट्र-कर्नाटकशी निगडीत मोठ्या प्रकल्पास मंजुरी!, आंतरराज्यीय वाहतुकीस चालना मिळणार

Jalgaon News : जळगावात आमदारकीची जागा ३ वर्षांपासून रिक्त; जिल्हा परिषद निवडणुकांमुळे विधान परिषदेचा पेच कायम!

MPSC Exam Result : शेतकऱ्याच्या मुलीची उपविभागीय कृषी अधिकारीपदाला गवसणी

Latest Marathi News Live Update : शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्याचा विरोध, अंगावर पेट्रोल ओतून शेतकऱ्यांचा आत्महत्येचा प्रयत्न

तारापूर औद्योगिक क्षेत्रात स्वच्छतेचा बोजवारा, रस्त्यांच्या कडेला कचऱ्याचे ढीग; कामगारांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

SCROLL FOR NEXT