विदर्भ

चमत्काराची प्रतीक्षा! आजारी निकिताचा मुलीत अडकला जीव

विवेक राऊत

चांदूररेल्वे (जि. अमरावती) : आजारामुळे सहा महिन्यांपासून अंथरुणाला खिळलेल्या निकिताला दोन वर्षांच्या मुलीसाठी जगण्याची खूप इच्छा आहे. आपण या आजारातून बरे होऊ, असे तिला रोज वाटते. मात्र, घरच्या परिस्थितीपुढे तिचे आईवडील आणि भाऊ हतबल झाले आहेत. डॉक्टरांनी सांगितलेल्या गोळ्या आणण्याचीही ऐपत नसलेल्या वानखडे कुटुंबाला आता काही चमत्कार होण्याचीच प्रतीक्षा आहे. (Help-needed-for-Nikita's-treatment)

निकिता रमेश वानखडे, असे आजारी असलेल्या युवतीचे नाव. चांदूररेल्वे तालुक्यातील राजुरा येथे ती आई-वडिलांच्या कुडाच्या एका झोपडीत राहत आहे. काही वर्षांअगोदर इतर मुलींप्रमाणे तिचे नागपूर येथील युवकासोबत लग्न झाले. त्यातच एका मुलीला तिने जन्मही दिला, पण दुर्दैवाने आजाराने निकिताला ग्रासले. आधीच शरीराने दुबळ्या असलेल्या निकिताचे मनही दुबळे झाले.

पालकांनी तिला अनेक दवाखान्यांत दाखविले. परंतु, छोट्या-मोठ्या उपचाराला निकिताचे शरीर साथ देत नसल्याने डॉक्टरांनी सेवाग्रामला हलविण्याचा सल्ला दिला. मात्र, दवाखान्यातील औषध आणण्यासाठीही पैसे नसलेल्या वानखडे कुटुंबीयांपुढे तिला कसे वाचवावे, असा यक्षप्रश्न पडला आहे. निकिताचे वडील फडे विकण्याचे काम करतात, तर आई मोलमजुरी करून कसाबसा संसाराचा गाडा ओढत आहे.

भाऊ दुकानात काम करून घराला हातभार लावण्याचे काम करीत असताना पोटच्या गोळ्याला जगविण्यासाठी कुटुंबाची धडपड सुरू आहे. निकिताला ग्रामसेवा लोक अभियानचे संयोजक बंडू आंबटकर यांच्याकडून औषधासाठी मदत मिळाली. परंतु, आजारचे स्वरूप मोठे आहे. अनेकांच्या मदतीने निकितावर सामाजिक बांधीलकीमधून उपचार पूर्ण होऊ शकतात, अशी वानखडे परिवारला आशा आहे.

(Help-needed-for-Nikita's-treatment)

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs NAM : भारताचा सर्वात मोठा विजय, ९३ धावांनी नामिबियाला नमवले; पाकिस्तानला चेपले, रविवारी IND vs PAK मध्ये Super 8s चा फैसला

IND vs NAM : भारतीय संघावर 'Fixing' चा आरोप! इशान किशनच्या विकेटवरून पाकड्यांनी वाद पेटवला, नेमकं काय घडलं?

Imran Khan Jail Torture : इम्रान खान यांचा तुरुंगात छळ सुरू ; एक डोळा पूर्णपणे निकामी होण्याच्या मार्गावर!

Education Reform : विद्यापीठांवर फसवणुकीचे गुन्हे दाखल करावेत का ? सामाजिक कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांचा सवाल

Ahmedabad Plane Crash: अहमदाबाद विमान अपघातात पायलट दोषी? इटालियन वृत्तपत्राच्या दाव्यावर भारताची प्रतिक्रिया

SCROLL FOR NEXT