Hinganghat accused Vikas Nagrale rise in mcr 
विदर्भ

हिंगणघाटच्या आरोपीची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेशी; काय झाला निर्णय?

सकाळ वृत्तसेवा

हिंगणघाट (जि. वर्धा) : येथील प्राध्यापक युवतीला पेट्रोल टाकून जाळणारा आरोपी विकेश ऊर्फ विक्‍की नगराळे हा सध्या नागपूर कारागृहात न्यायालयीन कोठडी भोगत आहे. न्यायालयीन कोठडी संपल्याने बुधवारी (ता. चार) त्याची व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेशी करण्यात आली. यात त्याची न्यायालयीन कोठडी 12 मार्चपर्यंत वाढविण्यात आली आहे. 

वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या नंदोरी चौक परिसरात दारोडा येथील 30 वर्षीय प्राध्यापिका तरुणीच्या अंगावर माथेफिरू विकेश नगराळे याने पेट्रोल टाकून पेटवून दिले व तो तेथून पसार झाला होता. यामध्ये ती 20 ते 30 टक्के भाजली. घटनेनंतर लगेच पीडित प्राध्यापिकेला नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, आठ दिवसांच्या संघर्षानंतर 10 फेब्रुवारीला तिचा मृत्यू झाला. 

घटनेनंतर आरोपीला चार तासांच्या आत पोलिसांनी बुटीबोरी जवळील टाकळघाट एमआयडीसी परिसरातून ताब्यात घेतले होते. यानंतर या प्रकरणात भादंविच्या काही कलमा वाढविण्यात आल्या होत्या. यानुसार पोलिसांनी तपास पूर्ण करून न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. हे दोषारोपपत्र न्यायालयाने स्वीकारले असून, प्रकरण लवकरच तारखेवर येणार आहे. 

सध्या हे प्रकरण हिंगणघाट येथील तालुका न्यायालयात आहे. यानंतर हे प्रकरण जिल्हा न्यायालयात येण्याची दाट शक्‍यता आहे. राज्याचे लक्ष असलेले हे प्रकरण सरकारी अभियोक्‍ता ऍड. उज्ज्वल निकम लढणार असून, ते केव्हा न्यायालयाच्या पटलावर येतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

अद्याप दोन ते तीन वेळा कोठडीत वाढ

आरोपी विकेश नगराळेच्या कोठडीत अद्याप दोन ते तीन वेळा वाढ करण्यात आली आहे. अंकिताच्या मृत्यूनंतर नागरिक संतप्त झाले होते. आरोपीला आमच्यासमोर हजर करण्याची मागणी केली होती. तसेच आरोपीला जिवंत जाळण्याची करण्यात आली होती. आरोपी विकेशच्या जिवाला संतप्त नागरिकांकडून धोका असल्याने व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पेशी करण्यात येत आहे. 

विकेशचा आत्महत्येचा प्रयत्न

कोठडीत असलेल्या विकेशने मला गोळ्या झाडून मारा अशी मागणी केल्याचे वृत्त बाहेर आले होते. तसेच त्याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे समजले होते. मात्र, पोलिसांनी त्यानी आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला नसल्याचे सांगितले होते. तो कैदेत असून, पोलिस त्याच्यावर लक्ष ठेऊन असल्याचे स्पष्ट केले होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune District News: वसतिगृहातून तीन अल्पवयीन विद्यार्थी गायब; १८ दिवस उलटूनही ठावठिकाणा नाही, जुन्नर पोलिसांकडून शोध सुरू

Pune FDA Action: पुण्यात FDAची कारवाई, भूम-वाशीतील खवा-पेढा विक्रेते रस्त्यावर; आमदार तानाजी सावंतांकडून प्रश्नाची दखल

रविवारी गुरुचा अश्लेषा नक्षत्रात प्रवेश; 'या' ७ राशींच्या आयुष्यात येणार सुख-समृद्धी

Nilanga Drought: निसर्गाची अवकृपा अन् कृषी विभागाची आकडेवारी; निलंग्यात खरीप पिकांचे १०० टक्के नुकसान, अहवालात ७० टक्केच नोंद

Latest Marathi News Update : शिरपूर तालुक्यात बिबट्याची दहशत; झोपडीत झोपलेल्या महिलेवर हल्ला

SCROLL FOR NEXT