Hinganghat incident accused person mother will meet victim 
विदर्भ

आरोपीची आई म्हणाली मी त्या मुलीला भेटायला जाणार; तीही माझ्या सुनेसारखी

सकाळ वृत्तसेवा

वर्धाः  जिल्ह्यातील हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर आरोपीच्या आईने पीडित तरूणीला भेटणार असल्याची प्रतिक्रिया एका वृत्तवाहिनीशी बोलताना दिली आहे.

आरोपी विकेशची आई म्हणाली, त्या तरूणीसोबत जे झाले ते चूक आहे. शेवटी ती ही कोणाची तरी लेक आहे.विकेशच्या आईने आपल्या सुनेकडे पाहून ती ही कोणाची तरी सून आहे, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.आरोपी विकेशच्या आईने पीडित तरूणीला रूग्णालयातून बरी होऊन आल्यावर नक्कीच भेटायला जाईन, असे सांगितले आहे.

हिंगणघाट येथे घडलेली घटना एकतर्फी प्रेमातून घडली. आरोपी विकेश हा विवाहित असूनही एकतर्फी प्रेमातून त्याने भररस्त्यात प्राध्यापक तरूणीवर पेट्रोल ओतून तिला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केला. यात ती तरूणी गंभीर जखमी झाली. तिच्या त्वचेवर आणि श्वसनप्रक्रियेवर परिणाम झाला असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

आरोपी विकेश आणि पीडित तरूणी यांची दहावीपासून ओळख होती. तसेच दोन्ही कुटुंबातील पालकांमध्येही चांगले संबंध होते. विकेशची तिच्यासोबत लग्न करण्याची इच्छा होती परंतू तसे झाले नाही.त्यानंतर स्वेच्छेने त्याने प्रियासोबत एप्रिल 2019 मध्ये विवाह केला. त्यांना दहा दिवसांची मुलगीही आहे.

आरोपीच्या घरातील लोकांनी सांगितल्याप्रमाणे घटनेच्या आदल्या दिवशी विकेश खूप तणावात होता. रात्रभर तो झोपला नाही. पहाटे कोणालाही न सांगता तो घरातून निघून गेला. त्याची पत्नी प्रियाच्या मते त्याचे आता इतर कोणत्याही तरूणीशी काहीच संबंध नाही असे त्याने सांगितलेले होते.

पण ज्या दिवशी तो घरातून निघून गेला त्या दिवशी दुपारी घरी पोलिस त्याला शोधत आले आणि तेव्हा त्याने असा गुन्हा केल्याचे सर्वांना कळले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bidkin Murder Case: बिडकीन डीएमआयसीत अनोळखी महिलेच्या खुनाचे गूढ उकलले; चारित्र्याच्या संशयातून पतीवर पत्नीचा गळा आवळून खुनाचा गुन्हा

Nepal Flash Flood: नेपाळच्या अवस्थेला चीन जबाबदार? पुराची माहिती 45 मिनिटं उशिरा दिल्याचा आरोप; नेमकं काय घडलं?

Pune Hooch Tragedy: विषारी गावठी दारू प्रकरणातील मुख्य सूत्रधार बाळू लोंढे ऊरळी कांचनमध्ये फिल्मी स्टाइल पाठलागानंतर अखेर पोलिसांच्या जाळ्यात

Pune Murder Case: इंदापूरमध्ये खून प्रकरणातील आरोपी १८ महिन्यांनी जेरबंद; पोलिसांनी वेषांतर करून रचला सापळा

Yavatmal Illegal Arms: दिग्रसच्या हरसूलमध्ये घातक शस्त्रसाठा उघड; २५ वर्षीय तरुणाच्या घरातून ६ धारदार तलवारी जप्त

SCROLL FOR NEXT