Hingna firing case Arms sales in Nagpur from other provinces crime police Sakal
विदर्भ

Crime News : परप्रांतातून नागपुरात शस्‍त्रविक्री?

सराईत गुन्हेगारांना पुरवठयाचा संशय, हिंगणा गोळीबार प्रकरण

सकाळ वृत्तसेवा

हिंगणा : नागपूर शहरातील गुन्हेगार आता ग्रामीण भागात पसरत आहेत. परप्रांतातून विक्रीसाठी सराईत गुन्हेगारांसाठी ‘वेपन्स’ येत असल्याचे बोलले जात आहे. हिंगणा गोळीबार प्रकरणातही प्रांतातून आलेल्या बंदुकीचा वापर केला असावा, असा अंदाज लावण्यात येत आहे. या दृष्टीने पोलिस प्रशासनाने तपासाची गती वाढवली आहे.

हिंगणा शहरातील श्रीकृष्ण नगर येथे मित्रानेच एका मित्राचा बंदुकीने गोळ्या झाडून हत्या केल्याची घटना घडली होती. या प्रकरणात पोलिसांनी जवळपास ११ आरोपींना अटक केली आहे. पत्नीला अपमानास्पद बोलण्याच्या संतापातून एका मित्राने दुसऱ्या मित्राला गोळीबार करून ठार केले.

९ जानेवारी रोजी रात्री दहा वाजताच्या दरम्यान ही थरारक घटना घडली होती. या घटनेची माहिती होताच पोलिस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलिस आयुक्त अश्वती दोरजे, पोलिस उपायुक्त अनुराग जैन यांनी भेट दिली होती.

या घटनेतील आरोपी हत्या झाल्यानंतर पळून गेले होते. हिंगणा ठाणेदार विशाल काळे यांनी या आरोपींना पकडण्यासाठी पथक तयार केले. या पथकाने घटनेच्या २४ तासाच्या आत सात आरोपींना अटक केली. यानंतर पुन्हा चार आरोपींना अटक करण्यात आल्याने आरोपींची संख्या ११वर पोहोचली आहे.

हत्येसाठी वापरण्यात आलेली बंदूक कुठून आली, हा पोलिसांच्या तपासाचा महत्त्वाचा विषय आहे. पोलिसांनी तपासाची गती वाढवली. हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली पिस्तूल ही नेमकी आली कुठून, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. यामुळे या प्रकरणाचा तपास ठाणेदार विशाल काळे स्वतः करीत आहेत.

ग्रामीण भागात बंदुक विक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची दाट शक्यता आहे. नागपूर शहरातील व ग्रामीण भागातील काही सराईत गुन्हेगारांकडे बंदुक असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.हिंगणा पोलिसांनाही बाहेर राज्यातून बंदूक विक्रीचा व्यवसाय कोण करतात, याचा तपास करण्याचे निर्देश वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिले आहे. यामुळे या प्रकरणातील पाळेमुळे खोलवर आहेत का, या दृष्टीनेही पोलिस आता तपास करीत आहेत.

परप्रांतीयांशी संबध

बंदुकीची विक्री इतर राज्यातून नागपूर जिल्ह्यात होत असल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू आहे. हत्या प्रकरणातील एक आरोपी मध्य प्रदेशातील रहिवासी आहे. यामुळे या आरोपीची परप्रांतीय लोकांशी संबंध आहे का, याची चौकशी पोलिस विभाग करीत आहे. नागपूर शहरासह ग्रामीण भागातील सराईत गुन्हेगारांना बंदूक विक्री करणारी टोळी असल्याचा दाट संशय पोलिसांना आहे. ही टोळी नेमकी कुठे आहे, याचा तपास पोलिस करीत आहेत.

हिंगणा गोळीबार प्रकरणाचा तपास जलद गतीने सुरू आहे. या प्रकरणात बंदुकीचा वापर करण्यात आल्याने घटनेचे गांभीर्य वाढले आहे. प्रकरणाचा तपास पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त अश्वती दोरजे व पोलीस उपायुक्त अनुराग जैन यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

११ आरोपींना अटक करण्यात आली आहे. या हत्या प्रकरणात वापरण्यात आलेली बंदूक पोलिसांनी जप्त केली आहे. बंदुक नेमकी कुठून येत आहे. याचा तपास केला जात आहे. परप्रांतात याचे काही कनेक्शन आहे का? या दृष्टीनेही तपासाची सूत्रे हलविली जात आहे. लवकरच या प्रकरणातील गुढ उकलण्याची शक्यता आहे‌.

- विशाल काळे ( तपास अधिकारी) ठाणेदार,हिंगणा.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

न्यायाधीश व्हायचं होतं, पण लग्नासाठी घरच्यांचा दबाव; वकील तरुणीनं बेपत्ता होण्याचा आखला प्लॅन, १३ दिवसांनी सापडली

Ajinkya Rahane: अजिंक्य रहाणेचा मोठा निर्णय! युवा नेतृत्वासाठी मोकळी केली वाट; म्हणाला, हीच योग्य वेळ...

ठरलं तर मग! या दिवशी सुरु होणार ‘स्टार प्रवाह’वर दोन नवीन मालिका, वेळही ठरली! तर हे कलाकार घेणार प्रेक्षकांचा निरोप

Everest Base Camp: 'सातारच्या ६३ वर्षीय गिर्यारोहकाने सर केला एव्हरेस्ट बेस कॅम्प';खडतर चढाई करत हिमालयाच्या शिखरावर फडकवला मराठी झेंडा

Maharashtra Latest News Update: बाळासाहेब थोरात यांच्या समर्थनार्थ निघालेल्या मोर्चाला प्रचंड गर्दी...

SCROLL FOR NEXT